प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात, लग्नाची तारीख झाली लीक

Prathamesh Parab Wedding: गेल्या काही दिवसांपासून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लगीनसराई सुरु आहे. कोणी विवाहबंधनात अडकत आहे तर कोणी साखरपुडा उरकत आहेत. दरम्यान आता टाईमपास फेम अभिनेता दगडू म्हणजेच प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेश त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत लग्न करणार आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी दोघे साखरपुडा करणार आहेत तर 24 फेब्रुवारी रोजी दोघेजण लग्न करणार आहेत.

Prathamesh Parab Wedding

Prathamesh Parab Wedding तारीख

अभिनेता प्रथमेश परब याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून आपल्या लग्नाची तारीख (Prathamesh Parab Wedding Date) जाहीर केली आहे. पोस्ट शेयर करत त्याने लग्नाच्या तारखेची बेरीज केली आहे आणि त्यातून त्याने इन्फिनिटी (अनंत) बनवले आहे. पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले आहे कि अनंत कायम आहे आणि तेच माझ्यासाठी तू आहेस, तूच माझी सदैव आहेस. प्रथमेश परबने पोस्ट शेयर करताच चाहते आणि कलाकार कमेंट करून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

14 फेब्रुवारी रोजी होणार साखरपुडा

प्रथमेश परबने याआधीच एक पोस्ट शेयर करून आपल्या साखरपुड्याची (Prathamesh Parab Engagement Date) तारीख जाहीर केली होती. त्याने पोस्ट शेयर करत आपल्या एंगेजमेंटच्या तारखेबद्दल सांगत आपली लव्ह स्टोरीबद्दल देखील सांगितलं होतं. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते कि १४ फेब्रुवारी २०२०- माझी व्हॅलेंटाइन डे स्पेशल फोटोशूट सीरिज बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला.

१४ फेब्रुवारी, २०२१ मध्ये आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. १४ फेब्रुवारी, २०२२ अनेक आठवणींसह रिलेशनशीपला एक वर्ष पूर्ण झालं. १४ फेब्रुवारी २०२३ आमच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर अनाऊंस केलं. १४ फेब्रुवारी २०२४ला आमच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. मग आता काहीतरी स्पेशल केलेच पाहिजे ना!!”