सावनीच्या तमाशानंतर मुक्ता भर मंडपात सागरसोबत मोडणार लग्न; ‘Premachi Goshta’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Premachi Goshta: स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मलिक सध्या खूपच लोकप्रिय झाली आहे. मुक्त-सागरच्या लग्नामुळे मालिका विशेष चर्चेमध्ये आली आहे. सईच्या प्रेमामुळे लग्नाला तयार झालेले मुक्ता-सागर लवकरच नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत. पण त्यापूर्वी मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Premachi Goshta मालिकेत मोठा ट्विस्ट

Premachi Goshta

प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) मालिकेमधील कालच्या भागामध्ये मुक्ता-सागरच्या लग्नाचे विधी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. नवरदेवाला वाजत-गाजत मंडपात आणण्यात आले. पण नंतर मुक्ताच्या आईने बन्जो बंद करायला सांगितला आणि सनई-चौघडे वाजवून नवरदेवाचे स्वग्न केले. मुक्ताची मावशी आणि आईने सागरसोबत कोळी कुटुंबाचं औक्षण केलं. यानंतर मुक्ताच्या वडिलांनी सागरच्या हाताला धरून त्याला लग्न मंडपात आणले. दुसरीकडे मुक्ता बोहल्यावर चढण्यासाठी खूप छान नटलेली दिसली. पिवळ्या रंगाच्या नऊवारीत तिचे सौंदर्य खूपच खुलले होते. लग्नाच्या विधीला सुरुवात होताच अर्जुन-सायलीची एंट्री होते. हे पाहून सागरला खूप आनंद होतो. अर्जुन सागरचा बालपणीचा मित्र असतो. तर सायली ही देखील मुक्ताची चांगली मैत्रीण असते असं दाखवण्यात आलं आहे.

आजच्या भागामध्ये मंगलाष्टके सुरु होताच सागरची आधीची बायको सावनीची एंट्री होणार आहे. सावनी सई व्यतिरिक्त अजून एक ११ वर्षाचा मुलगा असल्याचं सत्य मुक्ता समोर आणणार आहे. शिवाय सागरने त्या मुलाला कशाप्रकारे मारलं असे अनेक खुलासे भर मंडपात करणार आहे. त्यामुळेच आता मुक्ता लग्नाला नकार देताना पाहायला मिळेल. मुक्तासोबत संपूर्ण कुटुंब मंडपामधून निघून जाताना दिसणार आहे. मुक्ता-सागरचं लग्न होण्यासाठी अर्जुन-सायली मध्यस्थी करणार आहेत. सायली मुक्ताला सागरबरोबर लग्न करण्यासाठी समजवताना पाहायला मिळणार आहे. पण सायलीचं म्हणणं मुक्ता ऐकणार की नाही? हे आता येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल.

हेही वाचा: ‘या’ ठिकाणी सुरु आहे ‘आई कुठे काय करते’ सिरीयलचे शुटींग, मिलिंद गवळींनी शेयर केले सेटचे लोकेशन, म्हणाले…