स्प्लेंडरची बत्ती गुल! आली नवीन ई-बाईक, सिंगल चार्जमध्ये 171 किमी रेंज, फीचर्स समोर पल्सर-अपाचे देखील फेल

Pure Ecodryft 350 Electric Bike: डोमेस्टीक इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी प्युअरने आपली ई-बाईक इकोड्रिफ्टचे नवीन व्हेरिएंट इकोड्रिफ्ट 350 (Pure Ecodryft 350) लाँच केले आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली गेली आहे. ग्राहक देशभरामधील प्युअर ईवी डीलरशिप जवळ जाऊन हि बाईक बुक करू शकतात.

प्युअर ईव्हीचा दावा आहे कि हि बाईक 110 सेगमेंटमधील कम्यूटर मोटरसायकलशी स्पर्धा करेल. कंपनीनुअर हि इलेक्ट्रिक बाईक पेट्रोलवर चालणार्या कोणत्याही 10cc बाईक-स्कूटरच्या तुलनेत 7,000 रुपये जास्त बचत करते.

Pure Ecodryft 350

बॅटरी, रेंज आणि फीचर्स

(Pure Ecodryft 350) मध्ये कंपनीने 3.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरला आहे. बाईकची इलेक्ट्रिक मोटर 4 BHP पॉवर आणि 40 Nm टॉर्क जनरेट करते. सिंगल चार्जमध्ये हि ही ई-बाईक 171 किलोमीटरची रेंज देते. बाईकची टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रति तास आहे. तर यामध्ये स्पीड कंट्रोल करण्यासाठी चार वेगवेगळे राइड मोड देण्यात आले आहेत.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या ई-बाइक में रिवर्स मोड, कोस्टिंग रीजेन, हिल स्टार्ट असिस्ट, डाउन-हिल असिस्ट, पार्किंग असिस्ट, डिस्क ब्रेक, अँटी थेफ्ट अलार्म सारखे लेटेस्ट फीचर्स आहेत. बाईकमध्ये अलॉय व्हीलसोबतच संपूर्ण लाइटिंग LED मध्ये देण्यात आली आहे.

Pure Ecodryft 350 या बाईक्सला करणार टार्गेट

Pure Ecodryft 350 बाईक द्वार कंपनी डोमेस्टीक मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या स्प्लेंडर प्लस, प्लॅटिना, TVS स्पोर्ट आणि एंट्री-लेव्हल बाइक्सना लक्ष्य करत आहे. तर इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये हि बाईक हॉप ऑक्सो आणि ओबेन रोअर सारख्या ई-बाईकशी स्पर्धा करणार आहे.

4000 EMI वर घरी आणा

Pure EV आपली EcoDryft 350 बाईक 4,000 रुपये प्रति महिना EMI ऑप्शनसोबत देखील ऑफर करत आहे. यासाठी कंपनीने फायनांस कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. देशभरातील 100 पेक्षा जास्त खास डीलरशिप हा EMI प्लान उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा: Yamaha Neo Electric Scooter बद्दल आली गुड न्यूज, जाणून घ्या किंमत आणि स्मार्ट फीचर्स