Bigg Boss 17 Winner: अंकिता लोखंडे नाही तर ‘हा’ कंटेस्टंट बनणार बिग बॉस विजेता? सोशल मिडियावर नाव झाले लिक !

Bigg Boss 17 Winner: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. शोमध्ये खूपच रोमांच पाहायला मिळत आहे. बिग बॉस सीजन 17 चा शेवट आता जवळ आला आहे. बिग बॉस 17 ची ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी कंटेस्टंट खूपच मेहनत करत आहेत.

या सीजनचा विनर कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी आता या शोचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. अशामध्ये सोशल मिडियावर (Bigg Boss 17 Winner) या शोच्या विनरचे नाव लिक झाले आहे. या बातमीनंतर नेटिझन्स सोशल मिडियावर या कंटेस्टंटला शुभेच्छा देत आहेत. चला तर जाणून घेऊया हा कंटेस्टंट कोण आहे.

अंकिता लोखंडे नाही तर ‘हा’ कंटेस्टंट बनणार बिग बॉस विजेता – Bigg Boss 17 Winner

बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता लोखंडे विक्की जैन, मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोपड़ा हे सर्वांचे आवडते स्पर्धक आहेत. या कंटेस्टंटला त्यांच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महत्वाची बाब हि आहे कि हे कंटेस्टंट देखल बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. पण या शोचा विनर कोण असेल हे फक्त जनताच ठरवणार आहे. पण यादरम्यान जनतेचा निर्णय समोर आला आहे. बिग बॉस फॅन पेज खबरीने ने एक ट्वीट केले आहे. ज्यानुसार बिग बॉस 17 चा विनर (Bigg Boss 17 Winner) अंकिता लोखंडे, विक्की जैन किंवा मन्नारा चोपड़ा नाही तर मुनव्वर फारुकी असणार आहे.

28 जानेवारीला होणार बिग बॉस ग्रँड फिनाले

बिग बॉसच्या एका इनसाइड सोर्सने दावा केला आहे कि मुनव्वर फारुकी बिग बॉस 17 चा विनर असणार आहे. हे ट्वीट सध्या खूपच व्हायरल झाले आहे आणि लोकांनी मुनव्वर फारुकीला शुभेच्छा द्यायला देखील सुरुवात केली आहे. तथापि हा अद्याप अनुमान आहे. 28 जानेवारी रोजी ग बॉसचा ग्रँड फिनाले होणार असून त्यानंतर कोण विजेता ठरणार हे समजणार आहे.

बिग बॉस शोमध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. आतापर्यंत विकी जैनची आई आणि अंकिता लोखंडेची आई या शोमध्ये आल्या आहेत. त्याचबरोबर मुनव्वर फारुकीची बहीण देखील या शोमध्ये येणार आहे. तर अरुण मशेट्टीची पत्नी देखील त्याला सपोर्ट करण्यासाठी शोमध्ये येईल. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. इतर कंटेस्टंटचे कुटुंबीय देखील त्यांना सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये दिसतील.