रविंद्र जडेजाच्या घरात कौटुंबिक वाद उफाळला, जडेजाचे वडील म्हणाले; ‘माझा मुलगा बायकोचा गुलाम…’

Ravindra Jadeja Father

Ravindra Jadeja Father Anirudhsinh Shocking Revealations: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली. यावेळी त्याने सोशल मिडियावर एक भावनिक पोस्ट शेयर करून आनंद व्यक्त केला. तो सध्या दुखापतग्रस्त असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये यामधून स्वतःला सावरत आहे. दरम्यान एका मिडिया आउटलेटसोबत मुलाखतीमध्ये रविंद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) वडील अनिरुद्ध सिंह जडेजा त्याच्याबद्दल धक्कादायक गोष्ट उघड केली आहे. तथापि नंतर रविंद्र जडेजाने सोशल मिडियावर हि मुलाखती बकवास असल्याचे सांगत अपील केले आहे कि, ‘स्क्रिप्टेड मुलाखतीमध्ये सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका.

तो आम्हाला बोलवत नाही आणि आम्ही त्याला

मिडिया रिपोर्टनुसार अनिरुद्ध सिंह जडेजाने म्हंटले कि त्यांचा मुलगा रंविद्र आणि सून रिवाबासोबत त्यांचे काही संबंध नाहीत. ते आम्हाला बोलवत नाहीत आणि आम्ही त्यांना बोलवत नाही. आमच्यामध्ये कोणतेहि नाते नाही. 5 वर्षापासून आम्ही आमच्या नातीचा चेहरा पाहिलेला नाही.

एका मिडिया आउटलेट सोबत बोलताना त्यांनी म्हंटले कि लग्नाच्या काही महिन्यानंतर रीवाबा रिवाबा म्हणू लागली कि सर्व काही तिचेच असावे. तिच्या नावावर असायला हवे. खासकरून रिवाबाची आईच सर्वकाही सांभाळते. त्यांचा हस्तक्षेप खूप आहे.

नयनाबा ने त्याला आईसारखे वाढवले

मिडिया रिपोर्टनुसार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) चे वडील जामनगर मध्ये एक 2BHK फ्लॅटमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून राहत आहेत. त्यांनी म्हंटले कि आम्ही रविंद्रला क्रिकेटर बनवण्यासाठी खूप मेहनत केली होती. त्यांनी चौकीदारी केली. रविंद्रची बहिण नयनाबा ने देखील खूप मेहनत केली. त्याला आईसारखे वाढवले. आता नयनाबा सोबत देखील त्याचे काही देणे-घेणे नाही.

त्याचे लग्न झाले नसते तर बरे झाले असते

मिडिया रिपोर्टन्सुअर अनिरुद्ध सिंह ने रिवाबा च्या कुटुंबाबद्दल सांगितले कि त्यांना रविंद्रची गरज नाही. त्यांना फक्त पैशाची मतलब आहे. आम्हाला त्याची गरज नही. आमच्याजवळ शेत, पेन्शन आणि हॉटेल आहे. त्यांनी म्हंटले कि रविंद्र वेगळे राहतो. त्याच्या पत्नीने काय माहिती काय केले आहे. त्याचे लग्न झाले नसते तर, त्याला क्रिकेटर बनवले नसते तर खूप चांगले झाले असते. आम्ही अवस्थेमध्ये नसतो.

जडेजाने मुलाखत स्क्रिप्टेड असल्याचे सांगितले

रविंद्र जडेना (Ravindra Jadeja) ने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेयर करत लिहिले आहे कि स्क्रिप्टेड मुलाखतीमध्ये सांगितलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. रविंद्र जडेजा ने म्हंटले कि या मुलाखतीद्वारे पत्नी रिवाबाची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जडेजाने गुजरातीमध्ये लिहिले आहे कि, मुलाखतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. फक्त एकाच पक्षाचे म्हणणे मांडले गेले आहे. तो याचे खंडन करतो. त्याच्या पत्नीची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हि खूप निंदनीय आहे. त्याच्याजवळ देखील सांगण्यासारखे खूप आहे. जोपर्यंत तो हे सार्वजनिक करत नाही तोपर्यंत सगळे चांगले आहे. धन्यवाद.

News Title: Ravindra Jadeja Father Anirudhsinh Shocking Revealations