‘जेलर’ नंतर ‘मोईनुद्दिन भाई’ बनून रजनीकांतनं जिंकली चाहत्यांची मनं, जाणून घ्या काय आहे चाहत्यांची प्रतिक्रिया

Lal Salaam Review

Lal Salaam Review: 9 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट धडकले आहेत. ज्यामध्ये बॉलीवूडचा तेरी बातों में उल्झा जिया आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा लाल सलाम आणि रवी तेजचा ईगल चित्रपट सामील आहे. ज्यामुळे सोशल मिडियावर सध्या या तिन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. यादरम्यान लाल सलामला लोक ब्लॉकबस्टर म्हणताना पाहायला मिळत आहेत, चला तर जाणून घेऊया लाल सलामचा सोशल मिडिया रिव्ह्यू. (Lal Salaam Review)

चाहत्यांनी दिले रिव्ह्यू

एका युजरने चित्रपटगृहांबाहेरील लोकांचे रिव्ह्यू (Lal Salaam Review) शेअर करताना लिहिले कि, प्रत्येकजण रजनीकांतच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. रजनीकांतने जबरदस्त अभिनय केला आहे. ब्लॉकबस्टर लोडिंग. दुसया युजरने लोकांच्या रिव्ह्यूचा व्हिडीओ शेयर केला हे. तर एका युजरने चित्रपट ब्लॉक बस्टर असल्याचे म्हंटले आहे.

शिवाय एका युजरने लिहिले आहे कि लाल सलाम पहिला भाग पूर्ण झाला. भावनांनी भरलेला आणि कमी फॅन मोमेंट… पूर्णपणे पूर्णपणे कौटुंबिक प्रेक्षकांसाठी आणि ग्रामीण प्रेक्षकांशी, विशेषतः दक्षिणेकडील प्रेक्षकांशी चांगले जोडले जाईल. पूर्वार्धात थलायवाची उपस्थिती केवळ 15 मिनिटे होती परंतु ती सर्वोत्तम होती.

50 करोड बजट

लाल सलाम चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर 50 करोड बजटमध्ये बनलेला लाल सलाम चित्रपटामध्ये रजनीकांतचा 30 ते 40 मिनिटाचा कॅमियो आहे. तर चित्रपटासाठी थलायवाने 40 करोडपर्यंत फीस घेतली आहे. तर असे देखील म्हंटले जात आहे कि चित्रपट ब्लॉकबस्टर होईल. एडवांस बुकिंगच्या बाबतीत देखील चित्रपटाचे कलेक्शन जबरदस्त पाहायला मिळत आहे.

News Title: ranjinikanth movie lal salaam review