Royal Enfield Classic 350: रॉयल एनफील्ड मोटारसायकलचा दर्जा प्रत्येकासाठी वेगळा असतो, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब. कंपनीने अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. अशामध्ये खूप लोकांची इच्छा असे कि आपली देखील एखादी रॉयल एनफील्ड मोटारसायकल असावी. आम्ही इथे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) च्या धमाकेदार EMI प्लॅन बद्दल माहिती देणार आहोत.
Royal Enfield Classic 350 EMI प्लॅन
जर तुम्हाला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) घरी आणायची असेल, आणि तुमचे बजट कमी असल्यामुळे तुम्ही निराशा होत असेल तर काळजी करू नका. आम्ही इथे तुमच्यासाठी एक धमाकेदार प्लॅन घेऊन आलो आहोत. याचा फायदा घेऊन तुम्ही खूपच कमी मासिक हप्त्यांवर ही बाईक घरी आणू शकता. या लोकप्रिय बाईकला खरेदी करण्यासाठी तुम्ही इथे 50 हजार रुपये डाउन पेमेंटवर नुसार ईएमआय प्लॅन घेऊ शकता. जर तुम्ही या बेस व्हेरिएंटला खरेदी केले तर 2.17 लाख रुपये (ऑन रोड दिल्ली) किंमत पडते.
यासाठी 50 हजार रुपये डाउन पेमेंट भरल्यास तुम्हाला सुमारे 1.70 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही हि बाईक (Royal Enfield Classic 350) 36 महिन्याच्या कालावधीसाठी घेतली तर यादरम्यान तुम्हाला 8 टक्के व्याज आकारले जाईल, तर यानुसार तुम्हाला दर महिन्याला 5,086 रुपये ईएमआई भरावा लागेल. मासिक ईएमआई प्लॅन आम्ही आपल्यानुसार सानिग्ला आहे. तुमच्या शहरामध्ये मासिक ईएमआई प्लॅन थोडा वर खाली होऊ शकतो.
इंजिन आणि स्पेसिफिकेशन
यामध्ये 349.34cc ची क्षमता असलेले 4 स्टोक एयक कूल्ड इंजिन दिले गेले आहे. याची क्षमता 6,100 rpm वर 20.21 PS टॉर्क निर्माण करण्याची आहे. तर ते 27 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. बाईकमध्ये इंस्ट्रूमेंट कंसोल अॅनालॉग, डिजिटल आणि नेव्हिगेशन देण्यात आले आहे. शिवाय USB चार्जिंग पोर्ट आणि स्पीडोमीटर देण्यात आले आहेत. ड्युअल चॅनल ABS सह येणाऱ्या या बाइकमध्ये 13 लीटरची इंधन टाकी आहे.
हेही वाचा: मार्केटमध्ये धुमाकूळ घालतेय Royal Enfield Hunter 350, आपल्या नवीन EMI प्लॅनसह देत आहे बंपर ऑफर