लिस्टिंगला होणार तब्बल 106% फायदा, 33 रुपये प्राईस बँड, 15 जानेवारी पासून खुलणार IPO | Maxposure IPO

Maxposure IPO Open 15 January: जर तुम्ही एखाद्या SSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि मोठी बातमी आहे. गुंतवणूकदारांसाठी मॅक्सपोजर IPO आजपासून ओपन होत आहे. हा आयपीओ 17 जानेवारी पर्यंत सब्सक्राइब केला जाऊ शकतो. मॅक्सपोजर आयपीओचा प्राईस बँड 31 ते 33 रुपये ठेवण्यात आला आहे. कंपनीचा इश्यू साईज 20.26 करोड़ आहे. कंपनीचे शेयर NSE वर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

काय आहेत डीटेल्स (Maxposure IPO )

गुंतवणूकदार किमान 4000 शेयर्ससाठी आणि त्याच्या पटीमध्ये बोली लावू शकतात. रिटेल गुंतवणूकदारांसाठी एक लॉटसाठी किमान गुंतवणूक 1,24,000 रुपये आहे. यासाठी जास्तीत जास्त 132,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. कंपनीचे प्रमोटर प्रकाश जौहरी आणि स्वेता जौहरी आहेत. जीवायआर कॅपिटल अॅडवाइजर्स प्राइवेट लिमिटेड मॅक्सपोजर आयपीओचे (Maxposure IPO) बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर बिगशेयर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड इश्यूचा रजिस्ट्रार आहे. मॅक्सपोजर आयपीओ साठी मार्केट मेकर गिरीराज स्टॉक ब्रोकिंग आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी – इंडिया अहेड व्हेंचर फंड, वॉलफोर्ट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि फिनाव्हेन्यू कॅपिटल ट्रस्ट-फिनाव्हेन्यू ग्रोथ फंड यांनी आयपीओपूर्वीच कंपनीमधील शेयर विकत घेतले आहे.

काय चालू आहे GMP?

ipowatch.in नुसार मॅक्सपोजर आयपीओ (Maxposure IPO) ग्रे मार्केटमध्ये 35 रुपये प्रीमियम वर उपलब्ध आहे. याचा अर्थ आहे कि कंपनीचा शेयर 68 रुपये वर लिस्ट होऊ शकतो. पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना 106% पर्यंत फायदा होऊ शकतो. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 15 जानेवारी 2024 रोजी खुलणार आहे आणि 17 जानेवारी 2024 रोजी बंद होणार आहे. शेयर्सचे अलॉटमेंट 18 जानेवारी 2024 रोजी केले जाईल आणि रिफंडची सुरुवात 19 जानेवारी 2024 रोजी होईल. मॅक्सपोजर लिमिटेड 22 जानेवारी रोजी एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर लिस्ट होईल.

कंपनीचा व्यवसाय

2006 मध्ये अस्तित्वात आलेली ही कंपनी कंटेंट, एडवरटाइजिंग आणि टेक्नो सेक्टर मध्ये सक्रीय आहे. कंपनीची सर्विस इंडिगो, एअर इंडिया, गल्फ एअर, मध्य प्रदेश पर्यटन मंडळ, परराष्ट्र मंत्रालय, ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स यांना देखील पुरवल्या जातात. ही कंपनी विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवाशांना उड्डाणांतर्गत मनोरंजन सेवा देण्याचे काम करते.