Rubina Dilaik Twin Babies: दोन मुलींची आई बनली रुबीना दिलैक? ट्रेनरने गुड न्यूज शेयर केल्यानंतर डिलीट केली पोस्ट

Rubina Dilaik Twin Babies: टीव्ही स्टार रुबीना दिलैक दोन जुळ्या मुलींची आई झाली आहे, अशी पोस्ट तिच्या ट्रेनरने शेयर केली होती. पण काही वेळानंतर तिच्या ट्रेनरने शेयर केलेली पोस्ट डिलीट केली आहे. अशामध्ये चाहते आता रुबीना दिलैक कडून प्रॉपर कन्फर्मेशनची वाट पाहत आहेत.

Rubina Dilaik Twin Babies

ऑफिशियल कंफर्मेशन बाकी आहे – Rubina Dilaik Twin Babies

रुबीना दिलैक बद्दलच्या (Rubina Dilaik Twin Babies) या बातमीसाठी तिच्या चाहत्यांना थोडी वाट पहावी लागू शकते. सध्या रुबीना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्लाने याबद्दल ऑफिशियल विधान केलेले नाही. असे समजले जात आहे कि हे कपल लवकरच याबद्दल ऑफिशियल कंफर्मेशन देईल. चाहत्यांना आता हि उत्सुकता लागून राहिली आहे कि कपल कधी त्यांना गुड न्यूज देते.

प्रेग्नंसीची जर्नी शेयर करत होती रुबीना दिलैक

रुबीना दिलैक नेहमी सोशल मिडियावर सक्रीय राहते. तिने आपल्या प्रेग्नंसीची संपूर्ण जर्नी सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेयर केली. आपल्या प्रेग्नंसीच्या नवव्या महिन्यामध्ये तिने चाहत्यांना सांगितले होते कि तिला जुळी मुले होतील. असे समजले जात आहे कि कपल स्वतः ऑफिशियल कंफर्मेशन (Rubina Dilaik Twin Babies) शेयर करू इच्छिते. असे देखील होऊ शकते कि ते चाहत्यांसोबत मुलांची नावे देखील शेयर करतील. रुबीना दिलैक ने सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या प्रेग्नंसीची बातमी शेयर करून चाहत्यांना सरप्राईज दिले होते. इतकेच नाही तर रुबीना दिलैकची बहिण देखील प्रेग्नंट आहे. ती देखील आई होणार आहे. बहिण रोहिणी दिलैक च्या प्रेग्नंसीची बातमी रुबिना दिलैकने जहीर केली होती.

Rubina Dilaik Twin Babies

रुबीना दिलैक ने अभिनव शुक्लासोबत जून 2018 मध्ये लग्न केले होते. यानंतर कपल बिग बॉसमध्ये देखील गेले होते. बिग बॉसमध्ये रुबीना दिलैक ने चमकदार कामगिरी केली होती आणि ती विजेती ठरली होती. मात्र बिग बॉसमध्ये जाताना दोघांमध्ये मतभेद होते, असे वाटत होते कि दोघांचे तुणार. पण बिग बॉस दरम्यान दोघे पुन्हा जवळ आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वीकार केले कि यामुळे त्यांचे नाते वाचले. बिग बॉसमध्ये दोघांनी समजूतदारपणा दाखवला आणि दोघे जवळ आले. आपल्यामधील मतभेद त्यांनी संपवले. हेच कारण आहे कि रुबीना दिलैक चांगला परफॉर्मंस दाखवू शकली.

Also Read:  ‘अ‍ॅनिमल’ मधील ‘भाभी-2’ तृप्ति डिमरीचा जबरदस्त डांस, पाहून चाहत्यांना सुटला ताबा

Leave a Comment