लगीनघाई! ‘तुला शिकवीन चांगला धडा’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

Ruta Kale Wedding: मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अनेक कलाकार सध्या लग्न करून आपल्या एका नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. गौतमी-स्वानंद, मुग्धा-प्रथमेश, सुरुची-पियुष या जोडप्यांपाठोपाठ आता छोट्या पडद्यावरची एक अभिनेत्री नुकतच विवाहबंधनात अडकली आहे. नुकतेच तिने आपल्या लग्नाचे फोटो (Ruta Kale Wedding Photos) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहे.

Ruta Kale Wedding Photos

Ruta Kale Wedding Photos

तुला शिकवीन चांगलाच धडा’ सिरीयलमधील अभिनेत्रीने नुकतेच लग्न केले आहे. अभिनेत्री रुता काळे या सिरीयलमधून घराघरामध्ये फेमस झाली आहे. सिरीयलमध्ये तिने अक्षराच्या बहिणीची म्हणजेच इराची भूमिका केली आहे. नुकतेच अभिनेत्रीच्या मेहेंदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

Ruta Kale Wedding Photos

ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. तिच्या मेहंदी सोहळ्यामध्ये अभिनेत्री अनुजा साठेने देखील हजेरी लावली होती. लग्नामध्ये अभिषेकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर हिरव्या रंगाची शाल घेतली होती. तर रुताने लग्नासाठी हिरव्या रंगाच्या नऊवारीला पसंती दिली होती. आता तिच्या लग्नाचे फोटो (Ruta Kale Wedding Photos) देखल सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Ruta Kale Wedding Photos

अभिनेत्री रुताला नोव्हेंबर महिन्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड अभिषेक लोकनरने फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं. ज्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने खास मराठी पद्धतीने लग्न केले आहे. तिचा पती अभिषेक हा देखील मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सक्रीय आहे. तो दिग्दर्शक म्हणून काम करतो. रुताने काम केलेल्या पंधरवडा व अनवट या चित्रपटांचं दिग्दर्शन अभिषेकने केलेलं आहे.

Ruta Kale Wedding Photos

रुताने यापूर्वी ‘गोठ’ सिरीयलमध्ये महत्वाची भूमिका केली होती. सध्या तिने लग्नासाठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सिरीयलमधून ब्रेक घेतला आहे. आता लग्नानंतर अभिनेत्री सिरीयलमध्ये कधी पुनरागमन करते याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा, आता अयोध्यामध्ये करणार लग्न, आहे प्रभू श्री रामाचा भक्त