Roadlark Electric Bicycle: इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये आतापर्यंत फक्त इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक लाँच करण्याच्या ट्रेंड पाहायला मिळाला आहे, ज्या सिंगल चार्जवर 100 किमी किंवा त्यापेक्षा अधिक रेंज देऊ शकतात. पण आता Nexzu Mobility ने पहिली इलेक्ट्रिक सायकल आणली आहे जी सिंगल चार्जमध्ये तब्बल 100 किमीची रेंज देते.
Nexzu ची Roadlark Electric Bicycle
Nexzu Mobility ने आपली नवीन Roadlark Electric Bicycle लाँच केली आहे. यामध्ये 5.2Ah ची एक बॅटरी नेहमी सायकलमध्ये असणार आहे. तर 8.7Ah ची बॅटरी वेगळी करून चार्ज करता येणार आहे. यामुळे हि सायकल सिंगल चार्जमध्ये 100 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. या सायकलला 25 किलोमीटर प्रति तासच्या टॉप-स्पीडने चालवले जाऊ शकते. हि बॅटरी ३ ते ४ तासांत पूर्ण चार्ज होते.
Nexzu Roadlark फीचर्स
Nexzu Roadlark Electric Bicycle मध्ये ग्राहकांना फक्त दूरच जाण्याची रेंज मिळत नाही तर यामध्ये एबीएस सोबत डुअल डिस्क ब्रेक देखील आहेत जे याची राईड अधिक उत्तम बनवतात. त्याचबरोबर बॅटरी ऑपरेट करण्यासोबत यामध्ये पेडल असिस्ट देखील देण्यात आला आहे.
तर होम डिलिव्हरी सेगमेंट साठी कंपनीने Nexzu Roadlark चा कारगो व्हेरिएंट देखील सादर केला आहे. कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर पंकज तिवारीला आशा आहे कि यामुळे ई-कॉमर्स सेगमेंट मध्ये ई-सायकल (E-Cycle) च्या वापरास प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर पेट्रोलपासून चालणार्या स्कूटर आणि मोपेड इत्यादीवर अवलंबित्व कमी होईल.
या शहरांमध्ये मिळणार Roadlark
कंपनीची Nexzu Roadlark देशाच्या अनेक शहरांमध्ये डीलरशिप नेटवर्क वर उपलब्ध आहे. तर कंपनीने मदुराई, चेन्नई, गुरुग्राम, विजयपूर, अहमदाबाद आणि वल्लभगढ यांसारख्या शहरांमध्येही आपले नेटवर्क वाढवले आहे. कंपनीच्या 100km रेंजच्या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 44,083 रुपयांपासून सुरू होते.
हेही वाचा: मूड नुसार रंग बदलणारी सायकल, वजन फक्त 5 किलो, फीचर्स पाहून प्रेमात पडाल