Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात यशस्वी टीम मुंबई मुंबई इंडियंस (MI) सध्या अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. कारण मुंबई इंडियंस ने नुकतेच त्यांचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवले आहे आणि ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्याला मुंबई इंडियंस चा नवा कर्णधार म्हणून निवडले आहे.
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवताच सोशल मिडियावर मुंबई इंडियंस टीमला खूपच ट्रोल केले जात आहे. यादरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा आणि मुंबई इंडियंस चा मेंटोर सचिन तेंडूलकरने मुंबई इंडियंस टीम सोडली आहे.
सचिन तेंडूलकरने सोडले Mumbai Indians चे मेंटोर पद
भारतीय टीमचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियंस (Mumbai Indians) संघाकडून खेळत होता. आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर मुंबई इंडियंस मॅनेजमेंटने सचिन तेंडूलकरला आपल्या टीमचा मेंटोर म्हणून घोषित केले होते. पण मुंबई इंडियंस ने जेव्हा रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवले तेव्हा त्यानंतर सचिन तेंडूलकरने मोठा निर्णय घेत मुंबई इंडियंस टीमचे मेंटोर पद सोडले आहे. ज्यामुळे मुंबई इंडियंस टीमला मोठा धक्का बसला आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी ही बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हायरल होत आहे.
#HardikPandya को कप्तानी सौंपते ही #MumbaiIndians में हलचल, #SachinTendulkar ने भी मेंटर की पोजिशन छोड़ी pic.twitter.com/sm8lvTbant
— Zee Business (@ZeeBusiness) December 17, 2023
रोहित शर्मा ला कर्णधारपदावरून हटवण्यात आले
आयपीएलमध्ये मुंबई इंडियंस (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्मा ने टीमला आपल्या नेतृत्वाखाली पाच वेळा संघाला चॅम्पियन बनवले आहे. पण आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियंस ने मोठा निर्णय घेतला आणि आपला सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले. 26 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियंस ने ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या ला गुजरात टायटनमधून आपल्या टीममध्ये ट्रेड केले आणि नंतर काही दिवसांमध्येच त्याला मुंबई इंडियंसचा कर्णधार बनवले.
फक्त खेळाडू म्हणून खेळणार रोहित शर्मा
आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्मा आता फक्त एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. कारण आयपीएल 2024 ची ट्रेडिंग विंडो बंद झाली आहे ज्यामुळे रोहित शर्मा दुसऱ्या टीममध्ये जाऊ शकणार नाही. रिपोर्टनुसार रोहित शर्माला जेव्हा कर्णधारपदावरून हटवले तेव्हा दिल्ली कॅपिटलच्या टीमने रोहित शर्माला पाळ्या टीममध्ये सामील करण्याबाबत चर्चा केली. पण ट्रेडिंग विंडो बंद झाल्यामुळे रोहित शर्माला आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियंस कडून खेळावे लागणार आहे.