‘सैराट’ फेम अभिनेत्याचं व्यवसायामध्ये पदार्पण, पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरु केलं स्वतः कॅफे

Sairat Fame Actor Arbaj Shaikh

Sairat Fame Actor Arbaj Shaikh Business: 2016 मध्ये रिलीज झालेला नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मराठी सिनेमामध्ये या चित्रपटाने एक इतिहास रचला होता. न भूतो न भविष्य असे या चित्रपटाने यश मिळवले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे रेकॉर्ड अजून कोणी मोडू शकलेले नाही.

रिंकू राजगुरूने दिल्या शुभेच्छा

चित्रपटामध्ये आर्ची आणि परशाची लव्हस्टोरी पाहायला मिळाली होती. चित्रपटामध्ये या दोघांच्या प्रेमाला लंगड्या आणि सल्ल्याने चांगलीच साथ दिली होती. विशेष म्हणजे यांची मैत्री आज देखील कायम आहे. त्यामधील सल्ल्या म्हणजे अरबाज शेख (Arbaj Shaikh) याने आता व्यवसायामध्ये उतरण्याच्या निर्णय घेतला आहे. अरबाजने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर रिंकू राजगुरूने देखील एक व्हिडीओ शेयर करून त्याला याबदल शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडीओ शेयर करून दिली माहिती

गेले काही दिवस अनेक मराठी कलाकार व्यवसायामध्ये उतरत आहेत. त्यांच्या पावलावर पाउल ठेवत अरबाज शेखने देखील व्यवसाय सुरु केला आहे. त्याने पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज समोर, आंबेगाव बुद्रुक ‘बेक बडीज’ नावाचे कॅफे सुरु केले आहे. सोशल मिडियावर अरबाज शेख ने (Arbaj Shaikh) या कॅफेच्या जर्नीचा एक व्हिडीओ देखील शेयर केला आहे ज्यामध्ये कॅफेमधील सर्व इंटेरियर पाहायला मिळत आहे.

सल्ल्या म्हणजेच अरबाज (Arbaj Shaikh) आज देखील सिने इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. सैराटनंतर तो गस्त, झुंड, फ्री हिट दणका यासारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला होता. त्यानंतर तो लवकरच ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

News Title: sairat fame actor arbaj shaikh business