Salaar First Review: डंकी’ वर भारी पडणार प्रभासचा ‘सालार’, क्लायमॅक्स पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतील

Salaar First Review: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार प्रभास (Prabhas) चा ‘सलार: पार्ट 1 सीजफायर’ (Salaar: Part 1 – Ceasefire) सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच मेकर्सनी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज केला होता, ज्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे प्रभासच्या सालार सोबत होणार असलेली टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट एक दिवस आधीच म्हणजेच 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Salaar First Review

याआधी दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार होते. एकीकडे शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाला रिलीज आधीच लोकांनी ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. तर दुसरीकडे सालारच्या लोकप्रियतेला अक्षरशः उधाण आले आहे. सालारचा रिव्ह्यू समोर आला असून त्यामध्ये एक उत्कृष्ट चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे.

ट्वीट द्वारे शेयर केला Salaar First Review

Salaar First Review

एका युजरने ट्वीट करत लिहिले आहे कि, सीबीएफसी वेबसाइटवर सालार पाहिला. प्रशांत नीलने हाई ऑक्टेन अॅक्शन सोबत जबरदस्त व्हिज्युअल्स सादर केले आहेत. प्रभास यापूर्वी कधीच अशा अवतारामध्ये दिसला नव्हतं. पृथ्वीराज सुकुमारनने चांगले काम केले आहे आणि क्लायमॅक्सची फाईट या चित्रपटाची हायलाईट आहे. चित्रपटाला 5-4 स्टार रेटिंग (Salaar First Review) दिली गेली आहे. तर दुसरीकडे ‘डंकी’ ला चांगला रिव्ह्यू मिळाला आहे. लोकांना वाटत आहे कि पठाण आणि जवानच्या ब्लॉकबस्टरनंतर आता शाहरुख खान 2023 मध्ये ‘डिंकी’ सोबत हॅट्ट्रिक करणार आहे

प्रभासच्या सालार चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले आहे. चित्रपटामध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन शिवाय श्रुती हसन, जगपती बाबू, श्रेया रेड्डी, बॉबी सिम्हा, टिनू आनंद आणि ईश्वरी राव यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Also Read: राजकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘डंकी’ ला लोकांनी म्हंटले ‘मास्टरपीस’, क्रिटिक्सने दिले इतके स्टार

Leave a Comment