Salaar Second Song Qisson Mein Out: ‘सालार- पार्ट 1 सीजफायर’ चं दुसरं गाणं ‘किस्सों में’ रिलीज, हृदयाला भिडतील गाण्याचे बोल

Salaar Second Song Qisson Mein Out: गेल्या काही दिवसांपासून साऊथस्टार प्रभासचा ‘सालार- पार्ट 1 सीजफायर’ चित्रपट खूपच चर्चेमध्ये आहे. सालार चित्रपट थियेटरमध्ये रिलीज होण्यास फक्त आता काही तासांचा अवधी राहिला आहे. प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान आता सालारच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे नुकतेच रिलीज (Salaar Second Song Qisson Mein Out) केले आहे.

सालारचे दुसरे गाणे रिलीज – Salaar Second Song Qisson Mein Out

गाण्याच्या व्हिडीओची सुरुवात ईश्वरी राव यांच्या भूमिकेने होते ज्या आपल्या विद्यार्थ्यांना विचारतात कि तुम्हाला ते गाणे आठवते का जे त्यांनी शिकवले आहे. ते गाणे त्यांना एक-एक करून गायला सुरुवात करते नंतर इतर विद्यार्थी त्यामध्ये सामील होतात. गाण्याच्या दृश्यांमध्ये प्रभासला मॅकेनिक रुपामध्ये दाखवले गेले आहे जो विचार आणि वेदनेमध्ये हरवून गेला आहे.

Salaar Second Song Qisson Mein Out

सालार (Salaar) चित्रपट यामुळे खूपच चर्चेमध्ये आहे कारण चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले आहे, ज्यांनी ‘KGF’ सारख्या सुपरहिट सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान निर्मात्यांनी सालारचे दुसरे गाणे किस्सों में (Salaar Second Song Qisson Mein Out) नुकतेच सोशल मिडियावर रिलीज केले आहे. तेलगुमध्ये प्रथिकाडालो आणि आणि हिन्दीमध्ये किस्सों में असे गाण्याचे नाव आहे. गाण्याचा लिरिकल व्हिडीओ युट्युबवर रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये प्रभासच्या देवाची एक झलक पाहायला मिळते तर श्रुती हसन देखील व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये चित्रपटाचा दुनियेची एक छोटी झलक दाखवण्यात आली आहे.

रिया मुखर्जीने लिहिले बोल

सालारचे दुसरे गाणे ‘किस्सों में’ हिंदी भाषेशिवाय इतर अनेक भाषांमध्ये रिलीज केले गेले आहे. हिंदी गाण्याचे बोल रिया मुखर्जी यांनी लिहिले आहेत तर रवी बसरूर यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला तीर्थसुभाष, वेधा लक्ष्मी, रितुवीना राजेश, हरिचंदन अनीश, देवना सीके, नक्षत्र मनोज आणि अनुष्का सरीश यांनी आपला आवाज दिला आहे.

सालार बद्दल

प्रशांत नील यांनी सांगितले कि त्यांचा सालार चित्रपट त्यांच्या 2014 मध्ये आलेल्या उग्रमचे रूपांतरण आहे. चित्रपट लहानपणीच्या दोन मित्रांची स्टोरी सांगतो जे नंतर शत्रू बनतात. चित्रपटामध्ये प्रभास शिवाय पृथ्वीराज सुकुमारन, श्रुति हासन आणि जगतपति बाबू यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट तेलगु, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये 22 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करेल का नाही हे पाहणे आता उत्सुकतेने ठरणार आहे.

हेही वाचा: सस्पेंस आणि थ्रिलरने भरलेल्या ‘मैरी क्रिसमस’ चा ट्रेलर रिलीज, विजय सेतुपती आणि कॅटरीनाच्या लिपलॉकने वाढवली लोकांची उत्सुकता

Leave a Comment