एका चित्रपटासाठी तब्बल 100 करोड फीस, सलमान खानची संपत्ती ऐकून डोळे पांढरे होतील

Salman Khan Net Worth in Rupees: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान बॉलीवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखला जातो. गेल्या तीन दशकापासून तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य करत आहे. पण 2023 चे वर्ष त्याच्यासाठी खूपच खास राहिले. या वर्षामध्ये सलमान खानचे दोन चित्रपट रिलीज झाले होते. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

दोन्ही चित्रपटांचे बजट 425 करोड होते आणि चित्रपटाने एकूण 648.44 करोडची कमाई केली. तथापि सलमान खानने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याने मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, तेरे नाम पासून सुल्तान, टायगर जिंदा है, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान सारखे चित्रपट दिले आहेत.

Salman Khan Net Worth in Rupees

तथापि यामधील काही चित्रपट फ्लॉप राहिले. त्याने फक्त प्रसिद्धीच मिळवली नाही तर भरपूर संपत्ती देखील कमवली आहे. करियरच्या सुरुवातीला भाईजानची पहिली कमाई फक्त 75 रुपये होती आणि आज बॉलीवूड मधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक सलमान खान जवळ हजारो करोडची संपत्ती (Salman Khan Net Worth in Rupees) आहे. तो बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

वर्षाला 200 करोड कमवतो अभिनेता

सलमान खानने 1989 मध्ये बिवी हो तो ऐसी चित्रपटामध्ये सपोर्टिंग भूमिका करून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तथापि त्याला खरी ओळख मैंने प्यार किया चित्रपटामधून मिळाली होती. पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि सलमान खानने बॅकग्राउंड डांसर म्हणून देखील काम केले आहे. ज्यासाठी त्याला 75 रुपये मानधन मिळाले होते. 2023 मध्ये सलमान खानच्या नेट वर्थ बद्दल बोलायचे झाले तर असा दावा केला जग आहे कि आज भाईजन वर्षाला 220 करोड रुपये (Salman Khan Net Worth in Rupees) कमवतो. तर महिन्याला त्याचे इनकम 16 करोड रुपये आहे.

Salman Khan Net Worth in Rupees

पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार त्याच्या चित्रपटामधील एकूण कमाईच्या 60 ते 70% हिस्सा त्याला मिळतो. तर भाईजान एका चित्रपटासाठी 100 करोड रुपये फीस घेतो. सलमान खानला झेड प्लस सुरक्षा आहे. त्याच्याजवळ आलिशान कार्स आणि घरे आहेत.

सलमान खानची संपत्ती 3000 हजार करोड (Salman Khan Net Worth in Rupees)

बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान आणि त्यांचे पूर्ण कुटुंब बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. माहितीनुसार सल्मीन खानच्या एकूण प्रॉपर्टी हजारो करोडमध्ये आहे. बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानच्या एकट्याचे संपत्ती संपूर्ण कुटुंबापेक्षा जास्त आहे. माहितीनुसार खान कुटुंबाची एकूण संपत्ती 5259 करोड इतकी आहे. तर सलमान खानची एकूण संपत्ती 3000 करोड रुपये (Salman Khan Net Worth in Rupees) इतकी आहे. खान कुटुंबाच्या नावावर रजिस्टर एकूण संपत्तीचा सलमान खान एकटा मालक आहे. तर अरबाज खानचे नेटवर्थ 500 करोड़ आणि सोहेल खानची संपत्ती 333 करोड़ आसपास आहे. तर वडील सलीम खानची एकूण संपत्ती 1000 करोड़च्या आसपास आहे.

हेही वाचा: Dipika Padukone Net Worth: कमाईच्या बाबतीत दीपिका पादुकोणच्या पुढे दिग्गज स्टार्स देखील फिक्के, इतक्या संपत्तीची आहे मालकीण