धावांची बरसात करणारा कोहली कमाईच्या बाबतीत देखील आहे ‘विराट’, जाणून घ्या विराटचं नेटवर्थ

Virat Kohli Net Worth in Ruppes: क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चालते तेव्हा धावांचा पाऊस पडतो. तर कमाईच्या बाबतीत (Virat Kohli Net Worth in Ruppes) देखील तो ‘विराट’ आहे. विराट कोहली 5 नोव्हेंबर 2023 रोजी 35 वर्षाचा झाला आहे. एकीकडे तो क्रिकेटच्या माध्यमातून करोडोंची कमाई करतो तर दुसरीकडे तो अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. इतकेच नाही तर विराट कोहलीने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, जिथून त्याला मोठा रिटर्न मिळतो. चला तर जाणून घेऊया विराट कोहली किती संपत्तीचा (Virat Kohli Net Worth in Ruppes) मालक आहे.

127 मिलियन डॉलरची संपत्ती (Virat Kohli Net Worth in Ruppes)

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला किंग कोहली म्हणून देखील ओळखले जाते. त्याचे नाव जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये सामील आहे. माहितीनुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती 127 मिलियन डॉलर म्हणजेच जवळ जळव 1046 करोड रुपये (Virat Kohli Net Worth in Ruppes) आहे. विराटची वार्षिक कमाई जवळ जवळ 15 करोड रुपये आहे. तर तो महिन्याला तब्बल 1,25,00,000 रुपये कमवतो.

Virat Kohli Net Worth in Ruppes

BCCI कडून मिळतात वर्षाला 7 करोड

विराट कोहलीने भारतीय संघाचा कर्णधार असताना अनेक विक्रम आपल्या नावावर करून जगभरामध्ये आपली ओळख बनवली आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट टीमच्या ग्रेड A करारामध्ये सामील आहे. यामुळे त्याला करोडोंची कमाई होते तर प्रत्येक वर्षी आयपीएलच्या माध्यमातूनही तो प्रचंड कमाई करतो. BCCI कडून त्याला A करारा द्वारे वर्षाला 7 करोड रुपये (Virat Kohli Net Worth in Ruppes) मिळतात. तथ्पाई मॅच फीसबद्दल बोलायचे झाले तर गेमच्या फॉर्मेट नुसार त्याला फीस दिली जाते.

हेही वाचा: Dipika Padukone Net Worth: कमाईच्या बाबतीत दीपिका पादुकोणच्या पुढे दिग्गज स्टार्स देखील फिक्के, इतक्या संपत्तीची आहे मालकीण

सोशल मिडियावर मोठा सेलिब्रिटी

सोशल मिडियाद्वारे प्रसिद्ध कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्याची चांगली कमाई होते. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 266 मिलियन फॉलोअर्स आहेत. Hooper HQ 2022 इंस्टाग्राम रिच लिस्ट पाहिली तर टॉप-20 मध्ये भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रानंतर विराट कोहली एकमेव आशियाई आहे. यानुसार कोहली आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी जवळ जवळ 8.9 करोड रुपये चार्ज करतो.

Virat Kohli Net Worth in Ruppes

जाहिरात आणि इन्वेस्टमेंट मधून कमाई

दिग्गज भारतीय क्रिकेट विराट कोहलीने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामधून त्याला चांगला रिटर्न (Virat Kohli Net Worth in Ruppes) मिळतो. त्याचबरोबर त्याच्या कमाईमधील एक हिस्सा एंडोर्समेंट मधून देखील येतो. विराट मान्यवर, एमपीएल, पेप्सी, फिलिप्स, फास्टट्रॅक, बूस्ट, ऑडी, एमआरएफ, हीरो, वॉल्वोलिन, पुमा सारख्या ब्रँडच्या जाहिरातींमधून भरपूर पैसा कमावतो. गुंतवणुकीबाबत बोलायचे झाले तर कोहलीने ब्लू ट्राइब, चिझेल फिटनेस, नुएवा, गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, स्पोर्ट कॉन्व्हो आणि डिजीट सारख्या कंपन्यांच्या शेयर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकतेच दिवंगत सिंगर किशोर कुमारचा बंगला रेंटवर घेतला होता. ज्यामध्ये त्याने एक अप्रतिम रेस्टॉरंट उघडले आहे. कोहलीच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘One8 Commune’ आहे.

आलिशान लाईफ आणि महागड्या कार्स

विराट कोहलीच्या कमाईनुसार त्याची लाइफस्टाइल देखील खूपच आलिशान आहे. याचा अंदाज त्याच्या कार कलेक्शन मधून येतो. कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये (Virat Kohli Car Collection) मध्ये एकापेक्षा एक महागड्या कार्स आहेत. माहितीनुसार त्याच्या कार कलेक्शनमध्ये Audi Q7 (70 ते 80 लाख रुपये), Audi RS5 (जवळजळव 1.1 करोड़ रुपये), Audi R8 LMX (जवळजवळ 2.97 करोड़ रुपये), Audi A8L W12 Quattro (जवळजवळ 1.98 करोड़ रुपये), Land Rover Vogue (जवळजवळ 2.26 करोड़ रुपये) इत्यादी कार्स सामील आहेत. काही मिडिया रिपोर्टनुसार विराटच्या जवळ करोडो किंमतीच्या दोन बेंटले कार देखील आहेत.