सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या नात्याचे ‘शुभ’ संकेत, कॅमेरा समोर दिसताच सचिनच्या लेकीनं लपवला चेहरा, व्हिडीओ व्हायरल

Sara Tendulkar and Shubhman Gill Dating Rumors: भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुभमन गिलच्या डेटिंगच्या अफवा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. पण या अफवांमध्ये किती तथ्य आहे? शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर खरंच एकमेकांना डेट करत आहेत का? वास्तविक, सोशल मिडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यानंतर सोशल मिडियावर लोक शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हणत आहेत.

शुभमन गिलची बहीण शहनील गिल आणि सारा तेंडुलकर दिसल्या एकत्र

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शुभमन गिलची बहिण शहनील गिल आणि सारा तेंडुलकर दिसत आहेत. सारा तेंडुलकर आणि शाहनील गिल रविवारी पापाराझींनी एकत्र दिसले. त्याचबरोबर दोघींचे फोटो देखील खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तर शहनीलने स्टायलिश ग्रे कलरचा टॉप घातला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अफवांना (Sara Tendulkar and Shubhman Gill Dating Rumors) आणखी वेग आला आहे.

व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल (Sara Tendulkar and Shubhman Gill Dating Rumors)

शुभमन गिलची बहीण शहनील गिल आणि सारा तेंडुलकर यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्ह्य्रल होत आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेरा समोर येताच सारा तेंडुलकर चेहरा लपवताना दिसत आहे. खरं तर, सारा तेंडुलकरला कॅमेरे टाळायचे होते. आता हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर युजर्स या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अथिया शेट्टी-केएल राहुलने दाखवली लग्नाच्या न पाहिलेल्या क्षणांची झलक, सुनील शेट्टीने दिली क्युट प्रतिक्रिया