Hero Xtreme 125R: हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने हिरो वर्ल्ड 2024 मध्ये स्टायलिश नवीन एक्सट्रीम 125R (New Xtreme 125R) कम्युटर मोटरसायकल लाँच केली आहे. जी लोकप्रिय सेगमेंट मध्ये पूर्णपणे नवीन आहे. हिरो एक्सट्रीम 125R ची किंमत 95,000 (एक्स-शोरूम) पासून सुरु होते. हे मॉडेल 125cc कम्युटर स्पेसच्या प्रीमियम रेंजमध्ये स्पर्धा करेल. खास करून याची स्पर्धा टीवीएस रेडर 125 सोह्त होईल. याची हायपर-स्टायलिश डिझाईन नवीन Xtreme 125R बाईकला हिरोच्या कम्युटर ब्रँडमध्ये आतापर्यंत पाहिलेल्या कोणत्याही बाईकपेक्षा वेगळ बनवते.
Hero Xtreme 125R शार्प स्टाईलवाली बाईक
Hero Xtreme 125R एक हेडलॅम्प अपफ्रंट असलेली अतिशय शार्प स्टाईलची बाईक आहे. जी बाईकला एक खास फ्रंट लुक देते. लो-स्लंग हेडलॅम्प पुढे दोन्ही बाजूला एलईडी टर्न इंडिकेटर्स सोबत येतात आणि टॉप वर DRL पाहायला मिळते. बाईक शार्प स्टाईल वाल्या फ्यूल टँक सोबत थोडी स्लिम दिसते. स्क्ट्रीम (Xtreme) 125R पूर्णपणे स्पोर्टी लुकसाठी स्प्लिट सीट्स आणि स्प्लिट ग्रॅब रेलने सुसज्ज आहे.
इंजिन पॉवरट्रेन
Hero Extreme 125R च्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, याला नवीन 125cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळते, जे 8,250rpm वर 11.39bhp पॉवर जनरेट करण्यासाठी ट्यून केलेले आहे, ज्याला 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
ड्युअल-चॅनल ABS व्हेरिएंट 99,500 मध्ये उपलब्ध
बाईकच्या फ्रंटमध्ये 37mm टेलीस्कोपिक फोर्क्स सस्पेंशन आणि रियरमध्ये शोवा मोनोशॉक सस्पेंशनचा वापर करण्यात आला आहे. ब्रेकिंग परफॉर्मन्स व्हेरियंटच्या आधारावर सिंगल फ्रंट डिस्क आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक किंवा डिस्क ब्रेक चे ऑप्शन मिळते. बाईक सिंगल-चॅनल ABS सह येते, तर ड्युअल-चॅनल ABS व्हेरिएंट 99,500 एक्स-शोरूम मध्ये उपलब्ध आहे.
हिरोने सादर केली नवीन टू-व्हीलर
Hero Xtreme 125R मध्ये एक डिजिटल कंसोल सोबत एक LCD यूनिट देखील मिळते. नवीन स्टायलिश नवीन कम्यूटर ऑफर लवकरच सुरु होणाऱ्या बुकिंगसोबत डीलरशिप वर उपलब्ध असेल. Xtreme 125R शिवाय हिरो मोटोकॉर्पने हिरो वर्ल्ड 2024 मध्ये Mavrick 440, Xoom 125R आणि Xoom 160 चे देखील अनावरण केले आहे.