Sarfaraz Khan Wife Romana Zahoor: युवा फलंदाज सरफराज खानला अखेर भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यामधील पहिल्या डावामध्ये सरफराज खानने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. सरफराज खान भारताचा 311 वा टेस्ट खेळाडू बनला आहे. या खास प्रसंगी सरफराज खान चे वडील नौशाद खान आणि त्याची पत्नी पत्नी रोमाना जहूर राजकोटला पोहोचले होते. यादरम्यान बुरख्यामध्ये मैदानामध्ये आलेल्या सरफराजच्या पत्नीची (Sarfaraz Khan Wife) सर्वत्र चर्चा होत आहे. ज्यानंतर प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.
सरफराजने अशाप्रकारे पत्नीवर केला प्रेमाचा वर्षाव
पत्नी रोमाना जहूर सोबत सरफराज खान चे भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरं तर, सरफराज खानचे वडील नौशाद खान आणि त्यांची पत्नी रोमना जहूर दोघेही क्रिकेटच्या मैदानावर खूप भावूक दिसत होते. नौशाद खानने सरफराजच्या टेस्ट कॅपचे प्रेमाने चुंबन घेतले आणि आपल्या मुलाला मिठी मारून खूप भावूक झाले.
यानंतर सरफराज ची पत्नी रोमाना जहूरला (Sarfaraz Khan Wife) देखील अश्रू अनावर झाले. सरफराजने मैदानावर पत्नीला मिठी मारली आणि तिचे अश्रू पुसले. या कपलचा मिठी मारतानाचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे.
कोण आहे रोमाना जहूर?
क्रिकेटर सरफराज खान च्या पत्नीचे नाव रोमाना जहूर आहे. रोमाना जहूर शोपियां जिल्ह्याची राहणारी आहे. टाईम्स ऑफ इंडियानुसार रोमाना जहूर बीएससी विद्यार्थिनी आहे. अनेक रिपोर्ट्सनुअर रोमाना जहूर सरफराज चुलत भावाची मैत्रीण आहे. सरफराज खान आणि रोमाना जहूर चे लग्न 6 ऑगस्ट 2023 रोजी झाले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. ज्यावर उमरान मलिक, सूर्यकुमार यादव आणि इतर भारतीय खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या होता.
सरफराज खान आणि रोमाना जहूरचे लग्न काश्मीरमध्ये झाले होते. सराफराज यामुळे खूपच खुश होता. सरफराज खान ने यावेळी म्हंटले होते कि “देवाने ठरवले होते की माझे लग्न काश्मीरमध्ये होणे माझे नशीब आहे. मला इथे खूप प्रेम मिळाले आणि जेव्हा देखील मला वेळ मिळेल मी इथे येईन.
सरफराज खान लव्ह स्टोरी
सरफराज खानला पहिल्याच भेटीत रोमना जहूर आवडली होती. एकदा रोमाना जहूर सरफराजच्या चुलत भावासोबत मॅच पाहायला आली होती. यादरम्यान दोघांची भेट झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोमानाच्या पहिल्या भेटीम्काध्येच सरफराजने लग्न करण्याच्या निर्णय घेतला होता. सरफराजच्या चुलत भावाच्या सांगण्यावरून रोमनाच्या कुटुंबीयांनी सरफराजच्या कुटुंबियांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दोघांच्या घरच्यांनी हे लग्न मान्य केले आणि दोघांचे लग्न झाले.