‘दंगल’ फेम सुहानी भटनागरचे निधन, वयाच्या 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Suhani Bhatnagar Death: बॉलीवूडमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 2016 मध्ये आलेल्या आमिर खानच्या दंगल चित्रपटामध्ये छोट्या बबीता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन (Suhani Bhatnagar Death) झाले आहे. ती अवघ्या 19 वर्षाची होती. या बातमीने प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मिडियावर प्रत्येकजण सुहानीच्या अशा अचानक एक्झीटमुळे शोक व्यक्त करत आहे.

सुहानी भटनागरचा मृत्यू कसा झाला?

सुहानी भटनागरच्या मृत्यूचे कारण तिच्या संपूर्ण शरीरामध्ये फ्लूड जमा झाल्याने झाला असल्याचे सांगितले जात आहे. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, ज्यामुळे तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. उपचारादरम्यान तिने जे औषधे घेतली, त्याचे साईड इफेक्ट झाले आणि हळू हळू तिच्या शरीरामध्ये फ्लूड जमा होऊ लागला. ती बऱ्याच दिवसांपासून दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती होती. सुहानीचे अंतिम संस्कार फरीदाबाद च्या सेक्टर-15 स्थित अजरौंदा स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.

कोण होती सुहानी भटनागर?

सुहानी भटनागर बॉलीवूडमधील प्रसिद्ध बाल कलाकार होती. तिने आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट “दंगल” (2016) मध्ये छोट्या बबीता फोगाटची भूमिका केली होती. तिला या भूमिकेमधून खूप लोकप्रियता मिळाली होती. चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये देखील काम केले होते.

अभिनयापूर्वी पूर्ण करायचे होते शिक्षण

दंगल नंतर सुहानीजवळ अनेक चित्रपटाच्या ऑफर्स आल्या होत्या, पण तिने अभिनयामधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या शिक्षणावर लक्ष देऊ इच्छित होती. अनेक मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते कि शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयामध्ये परतण्याच्या प्लान बनवला होता.

सोशल मिडियावर होती सक्रीय

सुहानी इंस्टाग्रामवर खूप सक्रीय होती. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत होती. तथापि तिची शेवटची पोस्ट नोव्हेंबर 2021 ची होती. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये तिने काही सन-किस्ड सेल्फी शेयर केले होते आणि कॅप्शनमध्ये “नोव्हेंबर??” असे लिहिले होते.

Suhani Bhatnagar Death

सुहानी भटनागर च्या अचानक मृत्यूने बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलेब्स आणि चाहते सुहानीला सोशल मिडियावर श्रद्धांजली देत आहेत. आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने देखील सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून सुहानीच्या निधनाबद्दल (Suhani Bhatnagar Death) दु:ख व्यक्त केले आहे. पोस्टमध्ये सुहानीची आई आणि कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली गेली आहे. त्याचबरोबर सुहानी नेहमी आमच्या मनामध्ये स्टार राहिली असे देखील लिहिले आहे.

News Title: suhani bhatnagar death news