Shahrukh Khan Net Worth in Rupees: बॉलीवूडमध्ये बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान 2 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतो. त्याने आतापर्यंत 90 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि त्याला उत्कृष्ट अभिनयासाठी 14 फिल्मफेयर सहित अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शाहरुख खान जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड संपत्ती कमवली आहे. शाहरुख खानची एकूण संपत्ती (Shahrukh Khan Net Worth in Rupees) अंदाजे 6,000 करोडपेक्षा जास्त आहे.
दिल्ली ते मुंबई आलिशान घर
अभिनेता शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्ली येथे एका मुस्ल्मिम कुटुंबामध्ये झाला होता. जन्मानंतर तो सुरुवातीचे पाच वर्षे आपल्या आजी-आजोबांसोबत मेंगलोरमध्ये राहिला आणि त्यानंतर तो दिल्लीला राजेंद्र नगर येथे आपल्या आईवडिलांकडे परत आला. त्याचे सुरुवातीचे शिक्षण राजधानी सेंट कोलंबा स्कूल येथे झाले, तर 1988 मध्ये शाहरुख खानने दिल्ली यूनिवर्सिटीच्या हंसराज कॉलेजमधून इकोनॉमिक्स मध्ये बॅचलर डिग्री मिळवली. यानंतर त्याने मुंबईचा रस्ता धरला आणि आज मायानगरीमध्ये बॉलीवूडचा बादशाह बनून आपले मोठे साम्राज्य निर्माण केले आहे.
760 मिलियन संपत्तीचा मालक (Shahrukh Khan Net Worth in Rupees)
शाहरुख खानला चित्रपट हिट असण्याची गॅरंटी देखील म्हंटले जाते. किंग ऑफ रोमांस नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या बळावर त्याने बॉलीवूडमध्ये फक्त यश मिळवले नाही तर अमाप संपत्ती देखील कमवली आहे. लाइफस्टाइल एशिया च्या रिपोर्टनुसार अभिनेता शाहरुख खानची एकूण संपत्ती जवळ जवळ 760 मिलियन डॉलर आहे. जी भारतीय चलनामध्ये (Shahrukh Khan Net Worth in Rupees) जवळ जवळ 6,324 करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.
अभिनेताच्या नेटवर्थमध्ये सर्वात मोठा हिस्सा त्याच्या चित्रपटामधून होणाऱ्या कमाईचा आहे. रिपोर्टनुसार शाहरुख खान एका चित्रपटासाठी 100 ते 150 करोड रुपये चार्ज करतो. तथापि त्याचे असे देखील चित्रपट आहेत ज्यासाठी त्याने पैसे घेतले नाहीत. यामध्ये नुकतेच रिलीज झालेला पठाण चित्रपट सामील आहे. तथापि रिपोर्टनुसार पठाण चित्रपट हिट झाल्यानंतर नफ्यातील 60 टक्के रक्कम शाहरुख खानच्या खात्यात गेली आहे. बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या नुकतेच आलेल्या पठाण आणि जवान चित्रपटाने जगभरामध्ये जवळ जवळ 2,000 करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे.
ब्रँड एंडोर्समेंटद्वारे मोठी कमाई
फक्त चित्रपटच नाही तर शाहरुख खान ब्रँड एंडोर्समेंटद्वारे आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे देखील मोठी कमाई (Shahrukh Khan Net Worth in Rupees) करतो. शाहरुख खान Pepsi, Hyundai Santro, Nokia, Lux, Dish TV, Big Basket, Reliance Jio, LG TV, Denver, ICICI Bank, Fair & Handsome सहित अनेक मोठ्या ब्रँडसोबत जोडला गेला आहे. शिवाय त्याच्या नेटवर्थमध्ये (Shahrukh Khan Net Worth in Rupees) विविध बिजनेसमध्ये केल्या गेलेल्या गुंतवणुकीचे देखील योगदान आहे. ज्यामध्ये एक यशस्वी व्यवसाय रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे. ज्याचा शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी सह-मालक आहेत. शिवाय तो कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएल संघाचा सह-मालक आहे.
मुंबईमध्ये 200 करोडचे घर दुबईमध्ये प्रॉपर्टी
अभिनेता शाहरुख खान खूपच आलिशान लाईफ जगतो. किंग खान म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेत्याजवळ अनेक महागड्या प्रॉपर्टी आहेत. मुंबई स्थित आलिशान हवेली मन्नतचा तो मालक आहे ज्याची किंमत जवळ जवळ 200 करोड रुपये इतकी आहे. शिवाय शाहरुख जवळ लंडनमध्ये एक विला आणि दुबईच्या पाम जुमेराह वर एक लक्झरी विला (Shahrukh Khan Net Worth in Rupees) आहे. दुबईच्या या भाग्मध्ये जगातील अनेक श्रीमंत लोकांचे घर आहे आणि यामध्ये आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीचे देखील घर सामील आहे.
कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक आलिशान कार
शाहरुख खानला क्रिकेट खूप आवडते. त्याचबरोबर त्याला महागड्या गाड्यांचा देखील शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या कार्स आहेत. रिपोर्टनुसार शाहरुख खानजवळ एक रोल्स-रॉयस फँटम ड्रॉपहेड कूप (Rolls-Royce Phantom Drophead Coupe), एक रोल्स-रॉयस कलिनन ब्लॅक (Rolls-Royce Cullinan), एक बेंटले कॉन्टिनेंटल जीटी (Bentley Continental GT), एक बुगाटी वेरॉन (Bugatti Veyron), एक बीएमडब्ल्यू 7-सीरीज (BMW 7-Series), एक बीएमडब्ल्यू 6-सीरीज कन्वर्टिबल (BMW-6 Convertible), एक लँड रोवर, रेंज रोवर स्पोर्ट, बीएमडब्ल्यू i8 आणि टोयोटा लँड क्रूजर सारख्या कार्स आहेत.
हेही वाचा: एका चित्रपटासाठी तब्बल 100 करोड फीस, सलमान खानची संपत्ती ऐकून डोळे पांढरे होतील