“अजिंक्य माझे पती अन्…”, शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला स्पेशल उखाणा, पहा व्हिडीओ

Shivani Surve Ukhana: मराठी मनोरंजनसृष्टीमधील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहे. दरम्यान अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये लगीनगाठ बांधली. ठाण्यामध्ये येऊर येथील एका रिसॉर्टमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सध्या दोघांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Shivani Surve Wedding

Shivani Surve Ukhana व्हिडीओ

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य यांच्या विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. कपलने शाही लुकची निवड केली होती. दोघेही लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. शिवानीने बदामी कलरचा लेहेंगा घातला होता तर अजिंक्यने सूट घालत डोक्यावर फेटा बांधला होता. लग्नामध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वेने अजिंक्यसाठी खास उखाणा (Shivani Surve Ukhana) देखील घेतला. ज्याचा व्हिडीओ सेलिब्रिटी प्रमोटर्स या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अजिंक्यसाठी घेतला खास उखाणा

व्हिडीओमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वेने अजिंक्यसाठी खास उखाणा (Shivani Surve Ukhana) घेताना दिसत आहे. “एक वाती एक ज्योती, अजिंक्य माझे पती अन् मी त्यांची सौभाग्यवती”, असा उखाणा शिवानीने अजिंक्यसाठी घेतला. शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नासाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

शिवानी सुर्वे वर्कफ्रंट

देवयानी या मराठी सिरीयलमधील अभिनेत्री शिवानी सुर्वेला विशेष ओळख मिळाली होती. शिवाय तिने बिग बॉस मराठी मध्ये देखील भाग घेतला होता. त्यानंतर अभिनेत्री मराठी चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. नुकतेच आलेल्या झिम्मा चित्रपटामध्ये देखील शिवानी सुर्वे अभिनय करताना दिसली आहे.

अजिंक्य ननावरे वर्कफ्रंट

तर शिवानीबरोबरच अजिंक्य देखील अभिनेता आहे. सध्या तो झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सिरीयलमध्ये काम करताना दिसत आहे. तर कुसुममध्ये देखील तो पाहायला मिळाला होता. तर पावनखिंड चित्रपटामध्ये देखील तो अभिनय करताना दिसला होता. ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर अजिंक्य आणि शिवानी पहिल्यांदा भेटले होते. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

हेही वाचा: शिवानी सुर्वे अडकली विवाहबंधनात ! थाटात पार पडला विवाहसोहळा, पहा लग्नाचे फोटो