शिवानी सुर्वे अडकली विवाहबंधनात ! थाटात पार पडला विवाहसोहळा, पहा लग्नाचे फोटो

Shivani Surve Wedding: शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. हे कपल मराठी मनोरंजनविश्वामधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता हे कपल विवाहबंधनात अडकले आहे. 31 जानेवारी रोजी सोशल मिडियावर साखरपुड्याचे फोटो शेयर करत कपलने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता दोघांनी लग्न केले आहे.

Shivani Surve Engagement

शिवानीने शेयर केले फोटो – Shivani Surve Wedding

शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो (Shivani Surve Wedding) सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे फिकट गुलाबी रंगाच्या भरजरी लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. शिवानी आणि अजिंक्यने विवाह सोहळ्याला पेस्टल रंगाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवानीच्या भावाने अजिंक्यचा पिळला कान

दरम्यान अभिनेत्रीने शेयर केलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये (Shivani Surve Wedding) तिचा भाऊ अजिंक्यच्या कान पिळताना देखील पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये दोघांचं गळ्यातील वरमाला, अभिनेत्रीच्या हातातील हिरवा चुडा, साधं आणि सुंदर मंगळसूत्र या गोष्टींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने फोटो शेयर करताच अल्पावधीमध्ये ते व्हायरल झाले आहेत. तर चाहते आणि कलाकार मंडळी त्यांच्या फोटोवर कमेंटकरून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

फोटो शेयर करत अभिनेत्री शिवानी सुर्वेने “आज दोन तारे एकत्र आले” असं कॅप्शन दिलं आहे. अजिंक्य आणि शिवानी बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेमध्ये होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. अखेर 8-9 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल विवाहबंधनात अडकले आहे. याआधी अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते.