Poonam Pandey Death: नेहमी वादामध्ये अडकलेल्या पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. पूनमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेत्रीच्या निधनाची (Poonam Pandey Death) बातमी शेयर करण्यात आली आहे. तर पूनम पांडेच्या अचानक निधनाच्या बातमीमुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. पूनम पांडे फक्त 32 वर्षाची होती.
पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करण्यात आली बातमी – Poonam Pandey Death
पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिले आहे कि कि, ‘आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, सर्वाइकल कॅन्सरमुळे आपली लाडकी पूनम पांडे गमवली आहे. तिच्या कॉन्टेक्टमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती तिला प्रेमाने भेटला. दुःखाच्या या प्रसंगी आम्ही तिच्या प्राइवेसी ची रिक्वेस्ट करतो. आपण आम्ही तिला आमच्या द्वारे शेयर केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रेमपूर्वक आठवणीत ठेऊ.’
पूनम पांडेच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना धक्का
पूनम पांडेच्या निधनाच्या (Poonam Pandey Death) बातमीला तिच्या पीआर टीमने नुकतेच कंफर्म केले आहे. तथापि हि इंस्टा पोस्ट नुकतीच शेयर करण्यात आली आहे. चाहत्यांना अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे, सोशल मिडियावर चाहते तिच्या पोस्टवर दुख व्यक्त करत आहेत.
रोहित वर्मा पूनम पांडेच्या निधनावर हैराण
डिझाईनर रोहित वर्मा देखील पूनम पांडे च्या अचानक निधनाच्या बातमीमुळे हैराण झाला आहे. त्याने पोस्ट शेयर करत म्हंटले आहे कि दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये त्याने पूनम पांडेसोबत शूट केले होते. त्याला देखील विश्वास बसत नाही आहे कि पूनम पांडे या जगामध्ये नाही. रोहित म्हणाला कि त्याला देखील हि माहिती टीम कडून देण्यात आली आहे कि ती होमटाउन कानपुरला गेली होती आणि तिचे तिचे अचानक निधन झाले.