श्रेयस तळपदेला लेकीने असं दिलं वाढदिवसाचं सरप्राईज! पाहा खास व्हिडीओ…

Shreyas Talpade Birthday: अभिनेता श्रेयस तळपदेने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेत्याने 27 जानेवारी रोजी आपला 48 वा वाढदिवस साजरा केला. डिसेंबर 2023 मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता तो पूर्णपणे बरा असून त्याने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे.

Shreyas Talpade Birthday

Shreyas Talpade ला मुलीने दिले खास सरप्राईज

नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदेने वाढदिवसाचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्याची मुलगी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला नेताना दिसत आहे. व्हिडीओ शेयर करत अभिनेत्याने भले मोठे कॅप्शन देखील शेयर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, हा वाढदिवस खूपच खास होता. माझ्या पत्नीने मला नवीन जीवनाची भेट दिली आहे. आद्याने मला जी भेट दिली आहे ती खरोखरच अमूल्य आहे. तिने तिची खोली सजवली आणि बोर्डवर लिहिले.

माझ्या पत्नीला केक आणि कॉन्फेटी आणि फुगे यासह तिला काय हवे आहे ते सांगितले, कार्ड स्वतः तयार/पेंट केले आणि जे खूपच मौल्यवान आहे., तिने स्वतः कोऱ्या पानांची एक वही बनवली, दोन अक्षरे डिझाइन केली (अविना आणि तविना ), त्यांच्यावर एक कथा लिहिली (तिने स्वतः लिहिलेले हे तिचे कथेचे पहिले पुस्तक आहे) आणि ते मला भेट म्हणून दिले….हे सर्व मला माहीत नसतानाही. जे माझ्यासाठी सरप्राईज आहे. आणखी काय हवे आहे? देव महान आहे आणि देव दयाळू आहे. धन्यवाद.

व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल

दरम्यान अभिनेत्याच्या मुलीने त्याच्या या विशेष वाढदिवसाला मोठे सरप्राईज दिले आहे. व्हिडीओमध्ये श्रेयस पिवळ्या टी-शर्टमध्ये पाहायला मिळत आहे. तर त्याची मुलगी त्याचा हात धरून त्याच्या वाढदिवसानिमित्त सजवलेल्या खोली मध्ये त्याला घेऊन जात आहे. यादरम्यान मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. तिने बोर्ड हॅप्पी बर्थडे डॅडा लिहून त्याला विशेष शुभेच्छा दिल्या. श्रेयसने शेयर केलाला हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. श्रेयस तळपदे ने देखील मुलीसोबत केक कापून आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला.