PG Bugatti Cycle: सुपर बाइक आणि सुपर कारच्या जमान्यामध्ये सायकल देखल सुपर झाली आहे. आज आपल्याला एकापेक्षा एक लेटेस्ट टेक्नोलॉजीच्या सायकल मार्केटमध्ये पाहायला मिळतील. या सायकल्सच्या किंमती देखील लाखोमध्ये असतात. पण आज आपण ज्या सायकलबद्दल जाणून घेणार आहोत जी लुक आणि किंमत दोन्हीमध्ये अनोखी (World Most Expensive Cycle) आहे. याचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता कि या सायकलला सुपर आणि लक्झरी कार बनवणाऱ्या बुगाटी कंपनीने बनवले आहे.
फ्रेंच सुपर कार ब्रँड बुगाटीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शो 2017 मध्ये हि सायकल सादर केली होती. पीजी बुगाटी सायकल (PG Bugatti Cycle) या नावाने लाँच करण्यात आलेली हि सायकल बुगाटीच्या 1,500 हॉर्स पॉवर सुपर कार चिरॉनपासून प्रेरित आहे. या कारची स्टाईल सायकलमध्ये देण्यात आली आहे. या सायकलचे फीचर्स जाणून तुम्हाला जेवढे आश्चर्य होईल त्यापेक्षा जास्त तिची किंमत जाणून आश्चर्य वाटेल.
PG Bugatti Cycle Price
पीजी बुगाटी सायकल (PG Bugatti Cycle) च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत जवळ जवळ 39 हजार डॉलर (जवळ जवळ 32 लाख रुपये) इतकी आहे. हि सायकल सुपर कारची हुबेहूब नक्कल करून बनवण्यात आली आहे. हि सायकल इतकी महाग असल्याचे पहिले कारण म्हणजे बुगाटीने या सायकलची निर्मिती केली आहे जी जगातील महागड्या ब्रँड पैकी एक आहे. शिवाय सायकलचे फीचर्स आणि टेक्नोलॉजी देखील याला खास बनवते. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीने याच्या लिमिटेड एडीशनच मार्केटमध्ये आणल्या आहेत आणि क्फाक्त 667 सायकल बनवल्या आहेत.
का आहे इतकी खास
या सायकलमध्ये वापरण्यात आलेले मटेरियल टॉपच्या स्पोटर्ट्स कारमध्ये वापरले जातात. नासा आपल्या अंतरिक्ष मिशनमध्ये जे मटेरियल वापरते, ते देखील या सायकलमध्ये वापरले गेले आहे. हि सायकल 95 टक्के खूपच मजबूत कार्बन फायबरपासून बनवली आहे. सायकलचे वजन फक्त 5 किलो आहे, ज्यामुळे हि जगातील सर्वात हलकी सायकल म्हणून ओळखली जाते. सीट, हँडलसह इतर सर्व भाग देखील कार्बन फायबरचे बनलेले आहेत. या सायकलमध्ये रंग बदलण्याचे देखील ऑप्शन आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एखादे बटण दाबताच सायकलचा रंग बदलेल.
रस्ता कसाही असो स्मूथ अनुभव देते
पीजी बुगाटी सायकल ला फिक्स्ड गियर बेल्ट ड्राईव्हच्या आधारावर बनवण्यात आले आहे. यामध्ये व्हर्टिकल शॉक ॲब्सॉर्बिंग बार आणि लेदर शीटचा वापर करण्यात आला आहे. तर चैनच्या ठिकाणी बेल्टच्या टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. याची कार्बन फ्रेम अशा इंजीनियर्सनी तयार केली आहे जे फॉर्मूला वन कार्स बनवतात. विशेष म्हणजे हि सायकल पब्लिक रोडवर चालवण्यासाठी डिझाईन केली गेली नाही.
हेही वाचा: सिंगल चार्जमध्ये 160 किमीची रेंज, स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीतील 3 जबरदस्त इलेक्ट्रिक सायकल