Shruti Marathe: मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) ला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आजवर तिने अनेक सिरियल्स, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. मराठी बरोबर तिने तमिळ आणि कन्नड चित्रपटामध्ये देखील कम केले आहे. झी मराठीवरील राधा ही बावरी सिरीयलमधून ती घराघरामध्ये ओळखली जाऊ लागली. नुकतेच तिने आरपार या युट्युब चॅनेलवर मुलाखत दिले आहे. ज्यामध्ये तिने आपल्या लाईफमधील अनेक अनुभव शेयर केले. यादरम्यान तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये आलेल्या कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव देखील शेयर केला.
Shruti Marathe ने शेयर केला अनुभव
श्रुती मराठे म्हणाली कि, अनेक वर्षांपूर्वी मला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव आला होता. तेव्हा मी या क्षेत्रामध्ये काही नवीन नव्हते, मला काम करून बरीच वर्षे झाली होती. आपल्या क्षेत्रामध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री उपलब्ध असतात, हे ऐकायला देखील घाण वाटते. हे कोणी पसरवलं? या गोष्टी कुठून सुरु झाल्या? एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी कराव्याच लागतात हे कुठून आलंय? मला खरंच समजत नाही.”
श्रुती मराठे (Shruti Marathe) पुढे म्हणते कि, एका चित्रपटासाठी मला फायनांसर भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला चित्रपटासाठी मानधनाबद्दल विचारले. मी त्याला एक विशिष्ट रक्कम सांगितली. तेव्हा ते म्हणाले, जर तू माझ्यासोबत त्या गोष्टी करण्यास तयार झालीस तर तुला जे मानधन हवे आहे ते देईल. आमच्या दोघांशिवाय तिथे कोणीच नव्हते. ती व्यक्ती मला तोंडावर अशी बोलली. दोन तीन मिनिटांसाठी मी देखील स्तब्ध झाले होते.
श्रुती मराठे पुढे म्हणाली कि, पुढे काय बोलावं मला काही सुचतच नव्हतं. मला गम फुटला होता, यापूर्वी माझ्यासोबत असे कधीच झाले नव्हते. त्यामुळे मला परिस्थिती कशी सांभाळायची मला काहीच माहिती नव्हते. थोडा विचार करून मी उत्तर देण्याचे ठरवले आणि मी त्याच्याच भाषेमध्ये उत्तर दिले. मी त्याला सरळ म्हंटले, अच्छा जर मी तुमच्यासोबत झोपले तर तुमची बायको मुख्य अभिनेत्यासोबत झोपणार का? तेव्हा तो म्हणाला तू असं का बोलतेस? मी त्यांना विचारले माझ्याबद्दल तुम्हाला माहिती कुटून मिळाली, यापुढे कोणासोबत बोलताना थोडा विचार करून बोला.