Arbaaz Khan Wedding : बॉलीवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेमध्ये आहे, कारण असे म्हंटले जात होते कि तो दुसरे लग्न करणार आहे. माहितीनुसार असा दावा केला गेला होता कि अरबाज खान 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खान (Sshoora Khan) सोबत लग्न करणार. हि माहिती एकदम बरोबर निघाली. अरबाज खान वयाच्या 57 व्या वर्षी शूरा खान सोबत विवाहबंधनात अडकला आहे. अरबाज खानने आपल्या लग्नानंतर पत्नीसोबतचे फोटो (Arbaaz Khan Wedding) सोशल मिडियावर शेयर केले आहेत.
शूरा बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tondon) ची मेकअप आर्टिस्ट आहे. मुंबईमध्ये अरबाज खानची बहिण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma) च्या घरी हे लग्न पार पडले. दोघांनी आपल्या जवळचे मित्र आणि कुटुंबियांसमोर लग्नाचे विधी पूर्ण केले. अरबाज खानने रात्री उशिरा इंस्टाग्राम अकाऊंटवरून शूरा खानसोबतचे आपले फोटो शेयर केले. फोटोमध्ये शूरा आणि अरबाज खान खूपच सुंदर दिसत आहे.
अरबाज खानने शेयर केले लग्नाचे फोटो (Arbaaz Khan Wedding)
अरबाज आणि शूरा (Arbaaz Sshoora Wedding Pics) दोघांनी लग्नासाठी फ्लोरस आउटफिट घातले होते. फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये देखील फ्लोरल डेकोरेशन केले होते. फोटो (Arbaaz Khan Wedding) शेयर करत अरबाज खानने लिहिले आहे कि, प्रियजनांच्या उपस्थितीमध्ये मी आणि माझी प्रेमिका या दिवसापासून आयुष्यभर प्रेमाने एकत्र राहण्यास सुरुवात करत आहोत. आमच्या विशेष दिवशी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे!
मुलगा अरहानने दिल्या नवीन आईसोबत पोज
अरबाज खानचा मुलगा अरहानचे फोटो देखील कपल सोबत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अरहान आपले वडील अरबाज आणि नवीन आई शूरा खानसोबत पोज देताना पाहायला मिळत आहे. तथापि मलाइका अरोड़ा या लग्नामध्ये सामील झाली नाही.
चित्रपटाच्या सेटवर झाली होती अरबाज-शूराची भेट
अरबाज खान आणि शूरा खान ची भेट त्यांच्या पटना शुक्ला या नवीन चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अभिनेत्याचे पहिले लग्न मलाइका अरोड़ा सोबत झाले होते. दोघांनी मार्च 2016 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती आणि 1998 मध्ये लग्न केले होते तर 19 वर्षानंतर 11 मार्च 2017 रोजी त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला होता. तर शूरा एक बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट आहे आणि ती रवीना टंडन सोबत काम करते.
हेही वाचा: हळद लागली…! गौतमी देशपांडेला लागली स्वानंद तेंडुलकरची उष्टी हळद, हळदीचे फोटो आले समोर