टी20 विश्व कप खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होणार हे 15 खेळाडू, हार्दिक पांड्या कर्णधार तर कोहली-रोहितला डच्चू?

टी20 विश्व कप: टी20 विश्व चषक 2024 अजून 6 महिने दूर आहे, पण सर्व देशांच्या संघांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. भारतीय टीमने देखील टी-20 वर्ल्ड कप 2024 बद्दल योजना बनवण्यास सुरुवात केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये यावेळी एकूण 20 संघ उतरणार आहेत. तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन राहिले होते पण तरीही अंतिम साम्याम्ध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता ज्यानंतर ICC टी-20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय टीममध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात.

हार्दिक पांड्या होऊ शकतो कर्णधार

टी20 विश्व कप

टी20 विश्व कप 2024 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला दिले जाणार यावरून सध्या क्रिकेट जगतामध्ये चर्चा सुरु आहे. पण रोहित शर्माने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये खूपच चांगली कप्तानी केली होती होती पण 2022 वर्ल्ड कप नंतर त्याने भारतासाठी एकदेखील टी-20 सामना खेळलेला नाही, ज्यामुळे टी-20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याला दिले जाऊ शकते.

टी20 विश्व कप

मात्र आयर्लंड दौऱ्यादरम्यान जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर सूर्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि दोघांनी चांगले नेतृत्व केले आहे. तथापि तथापि, 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली सुट्टीवर जाऊ शकतात

टी20 विश्व कप

भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्ड कप 2022 नंतर भारासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. ज्यामुळे टी20 विश्व कप 2024 मध्ये या दोन्ही खेळाडूंना संधी मिळणे अवघड आहे. वास्तविक टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या युवा संघाला पाठवायचे आहे आणि म्हणूनच या दोन खेळाडूंना संधी मिळणे कठीण आहे. टी-20 विश्वचषक 2024 ला अजून सहा महिने बाकी आहेत, त्यामुळे याबाबत काहीही सांगणे घाईचे आहे.

टी20 विश्व कप साठी भारताचा संभावित संघ

शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, जितेश शर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कर्णधार), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह असा असू शकतो भारतीय संघ.

Also Read: रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर भडकले मुंबई इंडियन्सचे कट्टर चाहते, मुंबई इंडियन्सला दिला झटका

Leave a Comment