टाटाची जबरदस्त ई-साइकल, फक्त 1 रुपयात चालणार 10 किलोमीटर, रेंज देखील जबरदस्त

Stryder Zeeta Plus: टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची पूर्ण मालकी असलेली सहाय्यक कंपनी स्ट्रायडरने भारतीय मार्केटमध्ये आपली नवीन Electric Cycle Stryder Zeeta Plus लाँच केली आहे. जबरदस्त लुक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक सायकलची सुरुवातीची किंमत (Tata electric cycle starting price) 26,995 रुपये इतकी आहे. कंपनीचा असा दावा आहे कि कमी अंतरासाठी डेली ड्राईव्ह म्हणून या सायकलचा वापर खूपच किफायतशीर आहे.

Stryder Zeeta Plus

सध्या कंपनीने हि सायकल इंट्रोडक्ट्री प्राईससोबत लाँच केली आहे, जी मर्यादित वेळेसाठी निश्चित करण्यात आली आहे. पुढे जाऊन या सायकलची किंमत 6000 रुपयांनी वाढू शकते. विशेष म्हणजे हि सायकल स्ट्रायडरच्या अधिकृत वेबसाईटवरून (Stryder official website) विकली जात आहे. नवीन लाँच बद्दल बोलताना स्ट्रायडरचे बिजनेस हेड राहुल गुप्ता म्हणाले कि, सायकलिंग उद्योगामध्ये एक अग्रगण्य खेळाडू म्हणून आमचा प्रयत्न देशातील वैकल्पिक मोबिलिटीच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे आहे.

हि इलेक्ट्रिक सायकल उच्च-क्षमतेची 36-व्होल्ट/6 Ah बॅटरीने पॅक केली आहे. ज्याबद्दल असा दावा केला गेला आहे कि जी 216 Wh पॉवर जनरेट करते. ब्रँडचाचा दावा आहे कि हि सायकल सर्व प्रकारच्या रोड कंडीशनमध्ये आरामदायी राईड देते. स्ट्रायडर ज़ीटा प्लसमध्ये आधीच्या ज़ीटा ई-बाइकच्या तुलनेत अधिका मोठा बॅटरी पॅक दिला गेला आहे.

Stryder Zeeta Plus

पॅडलशिवाय या सायकलचा कमाल वेग 25 किमी प्रति तास आहे. एका चार्जमध्ये हि इलेक्ट्रिक सायकल पेडल असिस्टच्या सहाय्याने जवळ जवळ 30 किलोमीटरची रेंज देते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त तीन ते चार तासाचा वेळ लागतो. स्ट्रायडर ज़ीटा प्लस एक स्टील हार्डटेल फ्रेम मध्ये बनवली गेली आहे जी स्मूथ आणि लेटेस्ट डिझाईनसोबत येते. हि पावरफुल ऑटो-कट ब्रेकसह सुसज्ज आहे आणि दोन्ही भागांना डिस्क ब्रेक दिला गेला आहे.

Stryder Zeeta Plus चा खर्च 10 पैसे प्रति किलोमीटर

कंपनीचा दावा आहे कि या इलेक्ट्रिक सायकलची बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी कंज्यूम होईल त्या आधारावर तिची रनिंग कॉस्ट फक्त 10 पैसे प्रति किलोमीटर आहे. 250W ची क्षमता असणाऱ्या BLDC इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेल्या या सायकलमध्ये स्टीलचा बनलेला MTB टाईप ओव्हरसाईज हँडलबार आणि SOC डिस्प्ले देखील मिळतो. याच्या डिस्प्ले वर बॅटरी रेंज, टाईम इत्यादी माहिती पाहायला मिळते.

कंपनी Stryder Zeeta Plus इलेक्ट्रिक सायकलची बॅटरी पॅक आणि मोटरवर 2 वर्षे आणि फ्रेमवर लाइफस्टाइल वॉरंटी देत आहे. हि सायकल 5 फुट 4 इंच पासून 6 फुट पर्यंत हाईट असणाऱ्यांसाठी चांगली आहे. या सायकलची पेलोड क्षमता जवळ जवळ 100 किलो आहे. यामध्ये वॉटर रेझिस्टंट (IP67) बॅटरी आहे. स्ट्रायडरच्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक सायकल्स विविध प्राईस सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत, ज्या देशातील 4,000 पेक्षा जास्त रिटेल स्टोर्समधून विकल्या जातात.