Tata Neu SBI Credit Card Benefits : टाटा डिजिटल ग्रुप आणि एसबीआय कार्ड यांनी एकत्रितपणे एक नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे, जे खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे जे टाटा न्यू अॅपचा वापर करतात. हे कार्ड टाटा ग्रुपच्या डिजिटल शॉपिंग, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रवासासारख्या सेवांवर रिवॉर्ड्सही देते. यात दोन कार्ड दोन व्हेरिएंट्स आहेत. एक म्हणजे Tata Neu Plus SBI Card आणि दुसरे Tata Neu Infinity SBI Card. त्यांची सर्व माहिती तुम्ही येथे तपासू शकता.
Tata Neu अॅपवर मिळतील हे सर्व रिवॉर्ड्स
या कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही टाटा न्यू अॅपवर केलेल्या खरेदीवर अधिक ‘NeuCoins’ कमावू शकता. हे NeuCoins डिजिटल रिवॉर्ड पॉइंट्स आहेत, जे तुम्ही पुढील खरेदीसाठी वापरू शकता. टाटा न्यू अॅपवर खरेदी केल्यावर तुम्हाला 5% पर्यंत NeuCoins चा लाभ मिळेल आणि शिवाय 1.5% NeuCoins चा फायदा RuPay चे विविध व्हेरिएंट वापरून यूपीआय ट्रान्झॅक्शन केल्यावर मिळेल.
टाटा ब्रँड्सवर खास ऑफर्स
टाटा च्या अनेक ब्रँड्सवरही तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतील. BigBasket, Croma, Tata 1mg, Tata Cliq, Air India आणि IHCL Hotels या प्लॅटफॉर्मवर वापरून रिवॉर्ड पॉइंट्सचा फायदा घेता येतो. फॉरेक्स मार्कअप फीबाबत सांगायचे तर Tata Neu Plus वर 3.5% आणि Tata Neu Infinity वर 1.99% पर्यंत फी आहे. दोन्ही व्हेरिएंट RuPay आणि Visa नेटवर्कवर उपलब्ध असून, ग्राहक एसबीआय कार्डच्या वेबसाइटवरून ऑनलाइन किंवा काही Croma स्टोअर्समधील एसबीआय कार्ड किओस्कवर ऑफलाइन अर्ज करू शकतात.
Tata Neu SBI Credit Card जॉईनिंग फी किती आहे?
या सर्व ब्रँड्सवर या कार्डद्वारे खरेदी केल्यावर तुम्हाला अधिक कॅशबॅक, सवलत आणि NeuCoins मिळू शकतात. याशिवाय जॉईनिंग चार्जेस वेगवेगळे आहेत. Tata Neu Plus SBI Card ची जॉईनिंग फी 499 रुपये आहे आणि त्यासोबत 499 NeuCoins मिळतील. त्याचप्रमाणे Tata Neu Infinity ची जॉईनिंग फी 1499 रुपये असून, त्यासोबत 1499 NeuCoins दिले जातील.
कॅशबॅकचा फायदाही मिळेल
या क्रेडिट कार्डच्या व्हेरिएंट्समध्ये अनेक इतर फायदेही दिले जात आहेत, जसे की एअरपोर्ट लाउंज प्रवेश इत्यादी. तुम्हाला प्रवास आवडत असेल किंवा तुम्ही खूप शॉपिंग करता, तर हे व्हेरिएंट्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच यामध्ये तुम्हाला दररोजच्या खरेदीवर रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि सवलत मिळते.
याशिवाय, या कार्डाने केलीली मोठी खरेदी असो, तुम्हाला सुलभ ईएमआय पर्यायही मिळतात. म्हणजे तुम्हाला हवे असल्यास मोठी रक्कम हप्त्यांमध्ये भरता येते. शिवाय एसबीआय कार्डच्या सुरक्षा सुविधाही यात आहेत, जसे की OTP, फिशिंग संरक्षण, आणि कार्ड लॉक/अनलॉकची सोय. ऑनलाइन वापर करताना देखील तुम्हाला सर्वसामान्य सुरक्षा फिचर्स मिळतील.
हे पण वाचा :- GST Collection | सरकारच्या खजिन्यात वाढ! एप्रिल 2025 मध्ये GST कलेक्शने विक्रम गाठला