Top 10 tv Marathi Serials TRP: जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ने वर्षअखेरीस मारली बाजी! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’आहेत टॉप 10 सिरियल्स, पाहा संपूर्ण लिस्ट

Top 10 tv Marathi Serials TRP: छोट्या पडद्यावरील सिरियल्समध्ये नेहमीची टीआरपीसाठी चढा-ओढ लागून राहिलेली असते. स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ या जुई गडकरीच्या सिरीयलने नेहमी प्रमाणे बाजी मारली आहे. सिरीयलने TRP च्या यादीमध्ये आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे.

लग्नाच्या ट्रॅकमुळे ‘प्रेमाची गोष्ट’ हि सिरीयल ऑनलाईन टीआरपीत पुढे निघून गेली होती मात्र टीव्हीच्या टीआरपीमध्ये ‘ठरलं तर मग’ सिरीयलचं पहिलं स्थान अबाधित आहे. सिरीयलमध्ये अभिनेत्री जुई गडकरीने सायली ची भूमिका केली आहे तर अमित भानुशालीने अर्जुनची भूमिका केली आहे. सायली-अर्जुनच कॉन्ट्रॅक्ट लग्न, सिरीयलमध्ये येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे गेल्या महिन्याभरापसून सिरीयल टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

Top 10 tv Marathi Serials TRP

Top 10 tv Marathi Serials TRP

ठरलं तर मग मग सिरीयल टीआरपीच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर (Top 10 tv Marathi Serials TRP) आहे तर प्रेमाची गोष्ट सिरीयल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर तुझेच मी गीत गात आहे तिसऱ्या, लक्ष्मीच्या पावलांनी चौथ्या, सुख म्हणजे नक्की काय असतं पाचव्या आणि आई कुठे काय करते सिरीयल सहाव्या क्रमांकावर आहे.

सातव्या क्रमांकावर कुण्या राजाची तू गं राणी, आठव्या क्रमांकावर ‘सुभेदार’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, नवव्या क्रमांकावर मन धागा धागा जोडते नवा आणि दहाव्या क्रमांकावर आता होऊ दे धिंगाणा’ सीझन २ यांना स्थान मिळालं आहे. शिवाय टॉप 15 च्या लिस्टमध्ये तुला शिकवीन चांगलाच धडा हि झी मराठी वरील एकमेव सिरीयल 14 व्या क्रमांकावर आहे.

दरम्यान झी मराठीवर सध्या नवीन मालिकांचा धडाका सुरु आहे. नुकतेच सुरु झालेल्या हार्दिक जोशीच्या जाऊ बाई गावात या शोने टीआरपीच्या शर्यतीत एन्ट्री घेत 20 वं स्थान मिळवलं आहे. सध्या शो आणि सिरियल्सला दर्शकांची चांगली पसंती पाहायला मिळत आहे.