Trader Rickshaw Driver Viral Video: सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना आपल्या परिस्थितीमुळे स्वप्नांना बाजूला ठेवावे लागते. कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर आल्यामुळे त्यांची स्वप्ने फक्त स्वप्नेच राहतात. धावपळीमध्ये अनेकांना आपली आवड, कला जोपासता येत नाही. मात्र 24 वर्षीय विशाल पाईकराव कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपली आवड देखील जोपासली आहे. सकाळी शेयर मार्केट आणि दिवसभर रिक्षा चालवणाऱ्या विशालचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशाल सकाळी शेयर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो आणि नंतर तो दिवसभर रिक्षा चालवतो.
सकाळी शेयर मार्केट आणि रिक्षा (Trader Rickshaw Driver)
विशाल पाईकरावची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. मात्र त्याचा संघर्षहि तितकाच मोठा आहे. कुटुंबाची जबादारी स्वतःवर असल्यामुळे विशालने सुरुवातीला जमेल ती कामे केली. कधी त्याने हॉटेलमध्ये वेटरचे काम केले तर कधी कुरियर बॉय म्हणून काम केले. त्यानंतर त्याला शेयर मार्केटबद्दल समजलं आणि त्याने त्याबद्दल शिकायला सुरुवात केली. हळू हळू त्यामध्ये त्याने पैसे देखील कमवले, त्यातलं नुकसान भरून काढण्यासाठी रिक्षा घेतली. सध्या सकाळी ट्रेडिंग करतो आणि त्यानंतर दिवसभर रिक्षा चालवतो.
नातेवाईकांचे टोमणे अन् कुटुंबाचा सपोर्ट (Trader Rickshaw Driver)
विशाल सांगतो कि त्याला कुटुंबाने खूप सपोर्ट केला आहे पण नातेवाईक नेहमी त्याला टोमणे मारायचे. लोक म्हणायचे कि शेयर मार्केटमध्ये बरबाद होशील त्यापेक्षा तू रिक्षाच चालव. तेव्हा मी त्यांना सांगायचो कि मी हि रिक्षा ट्रेडिंग करूनच घेतली आहे. शेयर मार्केट (Share Market) मध्ये ट्रेडिंग करून मी माझ्या कुटुंबाची आणि माझे स्वप्ने पूर्ण करेन असे तो सांगतो.
विशाल सांगतो कि त्याला कुटुंबाने खूप सपोर्ट केला आहे पण नातेवाईक नेहमी त्याला टोमणे मारायचे. लोक म्हणायचे कि शेयर मार्केटमध्ये बरबाद होशील त्यापेक्षा तू रिक्षाच चालव. तेव्हा मी त्यांना सांगायचो कि मी हि रिक्षा ट्रेडिंग करूनच घेतली आहे. शेयर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मी माझ्या कुटुंबाची आणि माझे स्वप्ने पूर्ण कारे असे तो सांगतो.
Trader Rickshaw Driver चा VIDEO व्हायरल
विशालचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. Viral Video पाहून लोक देखील अचंबित होत आहेत. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला लोक देखील खूप पसंद करत आहेत. अनेक लोकांनी त्यावर कमेंट करून विशालचे कौतुक देखील केले आहे.
Also Read
==> Upcoming IPO: खात्यामध्ये पैसे ठेऊन तयार राहा, डिसेंबरमध्ये येणार आहेत या कंपन्यांचे IPO