Karmaa Calling Teaser Out: रविना टंडन 90 च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. अभिनेत्री आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. रविना कर्मा कॉलिंग वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिरीजचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. रविना टंडनने स्वतः टीजर (Karmaa Calling Teaser Out) शेयर करून आपल्या वेब सिरीजची घोषणा केली आहे. हा टीजर शेयर करत अभिनेत्रीने लिहिले आहे कि, जसे काम कराल तसेच फल मिळेल. कर्म येऊ द्या मी सांभाळून घेईन.
रविना टंडनच्या Karmaa Calling Teaser Out
टीजरबद्दल बोलायचे झाले तर तो खूपच दमदार आहे. टीजरमध्ये रविना टंडन म्हणते कि, असे ऐकण्यात आले आहे कि सक्सेस मिळवण्यासाठी कोणतेही नियम नसतात. चूक-बरोबर काही नसते. तुमची तत्वे, आदर्श आणि इतकेच नाही तर तुमचे कुटुंब, सर्व काही **मध्ये गेले. लोक म्हणतात कि जसे कर्म तसे फळ. पण मी म्हणते कि जर जग तुमच्या पायाखाली असेल तर कर्म देखील काही करू शकत नाही.
या प्रोमोमध्ये रविना एकदम पॉवरफुल महिलेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा लुकदेखील जबरदस्त आहे. नेहमीप्रमाणे सिरीजच्या या टीजरमध्ये रविनाने आपल्या अभिनयाने सर्वांना इंप्रेस केले आहे.
केव्हा रिलीज होणार Karmaa Calling
वेब सिरीजबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये श्रीमंत लोकांचे वास्तव मांडण्यात आले आहे. सिरीजमध्ये रविना इंद्राणी कोठारीच्या भूमिकेमध्ये आहे. ग्लॅमरचे जग किती फसवे असते हे या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. हि सिरीज 26 जानेवारी रोईज OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर रिलीज होणार आहे.
Also Read: या वेब सिरीजमध्ये ओलांडल्या सर्व मर्यादा, भरभरून आहेत बोल्ड सिन्स