Budget Friendly Cars 2024: नवीन वर्ष 2024 चे स्वागत करण्यासाठी भारतीय मार्केटमध्ये अनेक दिग्गज कंपन्या आपल्या कार्स लाँच करण्याची तयारी करत आहेत. ज्यामध्ये टोयोटा पासून महिंद्रा, एमजी, टाटा सारख्या अनेक दिग्गज कंपन्या येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्या कार्स लाँच करणार आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही देखील एक बजट फ्रेंडली कार (Budget Friendly Cars 2024) खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर ह्या आगामी कार्सचा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.
Budget Friendly Cars 2024 लिस्ट
हुंडई क्रेटा फेसलिफ्ट: 2024
भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपल्या कार्सची जबरदस्त विक्री करणारी Hyundai मोटर कंपनी आपल्या Creta SUV चे 2024 मॉडेल लाँच करण्याच्या (Budget Friendly Cars 2024) तयारीत आहे. या SUV एक नवीन 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल जे उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम असेल, आणि 160ps पॉवर आणि 253Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. ट्रांसमिशनसाठी 6iMT आणि 7DCT पर्याय मिळेल. शिवाय सध्याच्या मॉडेलप्रमाणे इतर 2 इंजिन पर्याय देखील असतील. नवीन क्रेटामध्ये समाविष्ट असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर या एसयूव्हीच्या फ्रंट फेशियामध्ये एक नवीन लुक पाहायला मिळेल, ज्यामध्ये हेडलाइट्स, LED DRLs आणि ग्रिल डिझाईनमध्ये अपडेट मिळेल. या SUV ची किंमत अंदाजे 12 लाख रुपये इतकी असेल.
टोयोटा टेसर: 2024
नवीन वर्षामध्ये टोयोटा सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये (Budget Friendly Cars 2024) आपले मॉडेल सादर करू शकते. टेसर मध्ये समाविष्ट असलेल्या दमदार इंजिनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये .2-लीटर का डुअलजेट पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे जे 89hp ची पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये डुअल-टोन 5-सीटर केबिन सद्ख्या सुविधा देखील सामील आहेत. हि SUV मारुति सुजुकी फ्रोंक्स SUV वर आधारित टॉप एसयूव्ही असेल. कंपनी पुढील वर्षी हि कार लाँच करणार आहे. नुकतेच टेसर 2024 भारतीय रस्त्यावर टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली होती. या कारची अंदाजे किंमत 7.5 लाख रुपये आहे.
Also Read: Upcoming Electric Cars: 2024 मध्ये लाँच होणार या इलेक्ट्रिक कार्स, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
स्कोडाची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही
आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक स्कोडा 2024 मध्ये एक नवीन कॉम्पॅक्ट SUV लाँच (Budget Friendly Cars 2024) करणार आहे. त्यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार आहे. या कारमध्ये -सीटर केबिन, अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay ला सपोर्ट करणारी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारख्या अनेक उत्तम वैशिष्ट्यांची अपेक्षा केली जाऊ शकते. या सेगमेंटमध्ये ही SUV Skoda Kushaq च्या खाली ठेवली जाईल. स्कोडाच्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये व्हर्टिकल हेडलॅम्प हाउसिंग, पूर्ण-रुंदीची LED पट्टी, मोठी ग्रिल, नवीन बंपर आणि स्कल्पटेड बोनेट हे अपडेट फीचर्स म्हणून पाहिले जातील. या कारची अंदाजे किंमत 11 लाख रुपये आहे.
एमजी मोटर्सची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही 2024
MG मोटर्स नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही नवीन वर्ष 2024 मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल. या सेगमेंटमध्ये कंपनी आगामी SUV ला MG हेक्टर च्या खाली ठेवेल. तर कारचा फ्रंट लूक MG Aster सारखा असण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. टाटा नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी MG मोटर्स या नवीन कॉम्पॅक्ट कारवर काम करत आहे. भारतात येणारी कंपनीची नवीन कॉम्पॅक्ट SUV ही जागतिक मार्केटमध्ये उपलब्ध MG Baojun 510 पेक्षा सर्वोत्तम असेल. या कारची अंदाजे किंमत 10 लाख रुपये अपेक्षित आहे.
महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट 2024
आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा मोटर्स 2024 मध्ये आपली XUV300 चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याचा विचार करत आहे. XUV300 फेसलिफ्ट सध्याचे इंजिन पर्याय 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल, 1.2-लीटर T-GDI टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डीजल जारी करण्याचा अंदाज आहे. या SUV मध्ये असलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कारच्या केबिनमध्ये मोठ्या फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसोबत एक डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील असू शकतो. त्याचबरोबर कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल यांसारखी फीचर्स देखील असतील. या एसयूव्हीची अंदाजे किंमत 8 लाख रुपये आहे.