120W फास्ट चार्जिंग सोबत लाँच होणार Xiaomi चा हा जबरदस्त फोन, पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi 13T Pro Launch Date in India: शाओमी स्मार्टफोन युजर्ससाठी एक मोठी खुशखबरी आहे. कंपनीने आपला नवीन Xiaomi 13T आणि शाओमी 13T Pro भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यास मान्यता दिली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन सप्टेंबर 2023 मध्ये चीनी मार्केटमध्ये लाँच केले गेले होते. जर तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन नक्की जाणून घ्या.

Xiaomi 13T Pro Launch Date in India

Xiaomi चा हा नवीन 5G स्मार्टफोन आता चीनी मार्केटमध्ये लाँच झाला आहे. भारतीय मार्केटमध्ये हा फोन कधी लाँच होणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि फेमस टेक्नोलॉजी वेबसाईट 91Mobiles नुसार Xiaomi कंपनी हा फोन भारतीय मार्केटमध्ये 25 जानेवारी 2024 रोजी लाँच करू शकते.

Xiaomi 13T Pro

Xiaomi 13T Pro Specification

Xiaomi चा हा नवीन स्मार्टफोन Xiaomi 13T Pro अँड्रॉइड व्हर्जन 13 सोबत उपलब्ध असेल. जर तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याचे स्पेसिफिकेशन जरूर वाचा. या फोनमध्ये MediaTek चा Dimensity 9200 Plus पॉवरफुल प्रोसेसर दिला गेला आहे आणि इतर अनेक फीचर्स आहेत जे खाली टेबलमध्ये दिले आहेत.

SpecificationsDetails
ProcessorMediaTek Dimensity 9200 Plus
CPUOcta-core (3.35 GHz, Single Core + 3 GHz, Tri-core + 2 GHz, Quad-core)
RAM12 GB
Internal Storage256 GB
Display6.67 inches (16.94 cm); AMOLED
Resolution1220×2712 px (446 PPI)
Refresh Rate144 Hz
ProtectionGorilla Glass 5
Display TypeBezel-less With Punch-Hole
Rear Camera50 MP Wide Angle Primary Camera
12 MP Ultra-Wide Angle Camera
50 MP Telephoto (up to 20x Digital Zoom, up to 2x Optical Zoom) Camera
Video Recording (Rear)8K @24fps
Front Camera20 MP Wide Angle Lens
Front Camera Video RecordingFull HD @30 fps
Battery Capacity5000 mAh
Charging Speed120W Hyper Charging; USB Type-C Port
SIM SlotsSIM1: Nano, SIM2: Nano
5G SupportSupported in India
Expandable StorageNon-expandable
DurabilityDust Resistant, Water Resistant
Operating SystemAndroid v13

Xiaomi 13T Pro Display

Xiaomi च्या या नवीन स्मार्टफोन Xiaomi 13T Pro मध्ये डिस्प्ले स्क्रीन खूपच चांगली दिली गेली आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंच च्या मोठ्या साईजमध्ये AMOLED डिस्प्ले स्क्रीन मिळेल. स्क्रीनची रिझोल्यूशन साईज 1220×2712 पिक्सेल आहे आणि स्क्रीनच्या पिक्सेल डेंसिटी (446 PPI) शिवाय 144 Hz चा रिफ्रेश रेट देखील पाहायला मिळेल. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये Gorilla Glass 5 चे प्रोटेक्शन दिले गेले आहे. त्याचबरोबर Bezel-less आणि पंच-होल डिस्प्ले स्क्रीन देखील सामील आहे.

Xiaomi 13T Pro Camera

Xiaomi 13T Pro मध्ये कॅमेरा देखील जबरदस्त मिळेल. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 MP वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा 12 MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 20x डिजिटल झूम आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50 MP टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. शिवाय फोनमध्ये एलईडी फ्लॅशलाइटही देखील उपलब्ध आहे. प्रायमरी कॅमेरा 8K @24fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. समोरच्या बाजूला 20 MP वाइड अँगल सेल्फी कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही फुल एचडी @30 fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकाल.

Xiaomi 13T Pro

Xiaomi 13T Pro Processor

Xiaomi च्या नवीन 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने प्रोसेसर देखील तगडा दिला आहे. फोनमध्ये तुम्हाला MediaTek चा Dimensity 9200 Plus पॉवरफुल प्रोसेसर पाहायला मिळेल. फोनमध्ये हेवी अँड्रॉईड सॉफ्टवेअर युज करू शकता आणि गेमिंगचा आनंद घेऊ शकता. फोन हँग किंवा गरम होणार नाही. परफॉर्मेंस खूपच चांगला पाहायला मिळेल त्याचबरोबर प्रोसेसर 5G नेटवर्क देखील सपोर्ट करतो.

Xiaomi 13T Pro

Xiaomi 13T Pro Battery & Charger

Xiaomi 13T Pro मधील बॅटरी आणि चार्जरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या फोनमध्ये 5000 mAh मोठी बॅटरी लाईफ पाहायला मिळेल आणि चार्ज करण्यासाठी 120W चा हायपर फास्ट चार्जिंग ऑप्शन USB Type-C पोर्ट सोबत दिला गेला आहे. फोनला पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त 19 मिनिटांचा वेळ लागतो. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 7-8 तास तुम्ही फोन युज करू शकता.

Xiaomi 13T Pro Price in India and Competitors

शाओमी 13T Pro च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन सध्या चीनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. चीनी मार्केटमध्ये या फोनची किंमत 4,950 CN¥ आहे. म्हणजेच हा फोन भारतीय मार्केटमध्ये याच किंमतीनुसार लाँच होऊ शकतो. भारतीय चलनामध्ये हि किंमत जवळ जवळ 58,000 रुपये होते. Xiaomi च्या या नवीन 5G स्मार्टफोन Xiaomi 13T Pro ची स्पर्धा भारतीय मार्केटमध्ये OnePlus 11 आणि Samsung Galaxy S23 Ultra 5G सोबत होईल. दोन्ही स्मार्टफोन देखील खूपच प्रीमियम आहेत.

हेही वाचा: 200MP कॅमेऱ्यासह एन्ट्री घेणार Nokia चा हा जबरदस्त स्मार्टफोन, iPhone ला देणार तगडी टक्कर