IRCTC South India Package: भारतामध्ये फिरण्यासाठी ऑप्शंसची काही कमी नाही. तुम्हाला इथे फिरण्यासाठी अनेक ऑप्शंस सहजपणे मिळतात. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये फिरण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त ऑप्शंस आहेत. इथे देशामधीलच नाही तर विदेशामधील देखील टूरिस्ट (Tourist) येतात. जर तुम्ही देखील इथे फिरायला जाण्याची प्लानिंग करत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी खूपच कामाची आहे. वास्तविक आईआरसीटीसी (IRCTC) ने एक एयर टूर पॅकेज (IRCTC Air Tour Package) जारी केले आहे, ज्यामध्ये तुम्ही दक्षिण भारतातील ४ सुंदर टूरिस्ट डेस्टिनेशन (South India Tourist Destinations) फिरू शकता.
IRCTC South India Package
आईआरसीटीसीच्या या (IRCTC South India Package) एयर टूर पॅकेजचे नाव JEWELS OF SOUTH INDIA (NDA30) असे आहे. हे एयर टूर पॅकेज 9 डिसेंबर पासून राजधानी दिल्ली येथून सुरु होणार आहे. टूर पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांचे आहे. या एयर टूर पॅकेजमध्ये तुम्ही कुर्ग, म्हैसूर, ऊटी आणि बेंगलोर फिरू शकता. ट्रॅव्हलिंग मोड फ्लाईटचे असेल. दिल्ली ते बेंगलोर आणि कोईम्बतूर ते दिल्ली प्रवास इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटने होईल.
IRCTC South India Package मध्ये मिळेल 6 ब्रेकफास्ट आणि 6 डिनर
या टूर पॅकेजमधील एकूण लोकांची संख्या 30 आहे. एसी गाडीमधून तुम्हाला फिरवले जाईल. मील प्लानबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 6 ब्रेकफास्ट आणि 6 डिनर मिळेल. ऊटी सोडून इतर ठिकाणी तुम्हाला प्रत्येक दिवशी 1 लिटर पाण्याची बाटली मिळेल. राहण्याची व्यवस्था कुर्ग, म्हैसूर, ऊटी मध्ये असेल जिथे कुर्ग आणि ऊटीमध्ये तुम्हाला नॉन एसी रूम्स मिळतील. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स देखील मिळेल. शिवाय किंमतीमध्ये जीएसटी देखील सामील आहे.
टूर पॅकेज प्राईस
टूर पॅकेजच्या प्राईसबद्दल बोलायचे झाले तर सिंगल बुक केल्यास तुम्हाला 52,610 रुपये खर्च येईल. तर डबल शेयरिंगमध्ये 42,690 आणि ट्रिपल शेयरिंगमध्ये 41,090 रुपये इतका खर्च येईल. शिवाय 5 ते 11 वर्षाच्या मुलांसाठी बेड घेतल्यास 37,890 रुपये आणि 5 ते 11 वर्षाच्या मुलांसाठी बेड न घेतल्यास 35,270 रुपये आणि 2 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी बेड न घेतल्यास 27,410 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही देखील हे हवाई टूर पॅकेज बुक करण्याचा विचार करत असाल, तर IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकता.
हेही वाचा
==> सकाळी Share Market अन् दिवसभर रिक्षा; Trader Rickshaw Driver चा VIDEO व्हायरल