Mahindra XUV300 Facelift: बहुतेक महिंद्रा एसयूवी जसे XUV700, स्कॉर्पियो-N आणि थार आपापल्या सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवतात. पण XUV300 ची सातत्यपूर्ण विक्री सुरु ठेवली असली तरी म्हणावी तशी तीही लोकप्रियता वाढलेली नाही. आता कंपनी लवकरच Mahindra XUV300 Facelift मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. हि कर 2024 च्या पहिल्या सहामाहीमध्ये लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. एक्सटीरियर आणि पॅनोरामिक सनरूफ सारख्या नवीन फीचर्ससह XUV300 फेसलिफ्ट लाँच केल्यानंतर एसयूवीची डिमांड वधू शकते.
XUV300 फेसलिफ्टच्या टेस्ट म्यूल्स ला नुकतेच महिंद्राच्या नाशिक प्लांट येथे स्पॉट केले गेले होते. स्पाई शॉट्स मधून समोर येते कि XUV300 फेसलिफ्ट च्या एक्सटीरियर मध्ये फ्रंट फेसिया आणि रियर सेक्शनला रिफ्रेश केले गेले आहे. नवीन वापरण्यात आलेली डिझाईन लँग्वेज महिंद्राच्या अपकमिंग BE रेंज च्या इलेक्ट्रिक एसयूवी सारखी आहे. काही प्रमुख फीचर्समध्ये खास C-साइज चे एलईडी डीआरएल, अपडेटेड हेडलॅम्प आणि रिफ्रेश फ्रंट ग्रिल आणि बंपर यांचा समावेश आहे.
रियर बाजूला C-साइज चे लाइटिंग एलिमेंट देखील दिसू शकतात. यामध्ये बूट लिड आणि बंपर लुक मिळतो. साइड प्रोफाइल बहुतेक पूर्वीप्रमाणेच आहे. टेस्टिंग म्यूल मध्ये अलॉय व्हील्स सध्याच्या मॉडेलपरमेण आहे. तथापि असा अंदाज आहे कि टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये अलॉय व्हीलचा एक नवीन सेट मिळू शकतो. Mahindra XUV300 Facelift साठी काही नवीन कलर ऑप्शन देखील आहेत.
Mahindra XUV300 Facelift इंटीरियर अपडेट आणि फीचर्स
Mahindra XUV300 Facelift ला मोठ्या पॅनोरामिक टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह पाहिले जाऊ शकते. असा अंदाज आहे कि हे 10.25 इंचचे यूनिट आहे. सध्याचे मॉडेल 7-इंच टचस्क्रीनसह सुसज्ज आहे. XUV300 ला नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट स्क्रीन देखील मिळेल. यामध्ये सेंट्रल कन्सोलही अपडेट करण्यात आला आहे. टेस्ट म्यूलमध्ये बेज अपहोल्स्ट्री आहे, जी आधीपासूनच सध्याच्या मॉडेलसह उपलब्ध आहे. स्टीयरिंग व्हील देखील सेमच वाटते.
भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक
XUV300 भारतातील सर्वात सुरक्षित कार्सपैकी एक आहे, ज्याला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये 5-स्टार अडल्ट सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. हे शक्य आहे कि भारतामध्ये NCAP देखील प्रमाणित केले जाऊ शकते. सध्याच्या मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि सर्व 4-डिस्क ब्रेक्ससह दोन डझनहून अधिक सुरक्षा फीचर्स मिळतात.
XUV300 फेसलिफ्ट पॉवरट्रेन ऑप्शन
XUV300 फेसलिफ्ट सध्याच्या पॉवरट्रेन ऑप्शनसोबत सुरू राहील. यामध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल MPI इंजिन समाविष्ट आहे, जे 110ps कमाल पॉवर आणि 200Nm पीक टॉर्क जनरेट करते. 1.2-लिटर टर्बो पेट्रोल GDI इंजिन 130PS पॉवर आणि 230Nm टॉर्क जनरेट करते. तर, 1.5-लिटर टर्बो डिझेल इंजिन 117ps आणि 300nm टॉर्क जनरेट करते. सर्व इंजिनांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोशिफ्टचे ट्रान्समिशन ऑप्शन आहेत.
हेही वाचा: Mahindra Thar 5 Door मध्ये मोठी स्क्रीन आणि सनरूफ सहित असतील अनेक फीचर्स, जाणून घ्या कधी होणार लाँच