Prathamesh Parab Engagement: ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. अभिनेत्याने नुकतेच ‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्या मुहूर्तावर साखरपुडा उरकला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये लगीनघाई सुरु आहे. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकतच लग्नबंधनात अडकले. अशामध्ये आता प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर लवकरच विवाहबद्ध होणार आहेत.
अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर यांनी लग्न करण्याच्या निर्णय घेतला. अभिनेत्याने त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना देऊन सुखद धक्का दिला. त्याचबरोबर व्हॅलेंटाईन्स डे हा त्यांच्यासाठी खूपच खास असल्याचे देखील त्याने म्हंटले होते. याचे निमित्त साधत दोघांनी व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी साखरपुडा (Prathamesh Parab Engagement) करण्याचा निर्णय घेतला.
प्रथमेशच्या लग्नाचा मुहूर्त
प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेयर करत साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. 14 फेब्रुवारी 2024 रोजी दोघे साखरपुडा करणार असल्याचे त्यांनी पोस्टद्वारे सांगितले होते. त्यानंतर त्याने आणखी एक पोस्ट शेयर करून साखरपुड्याच्या 10 दिवसांनंतर 24 फेब्रुवारी रोजी लग्न करणार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले होते.
कपलसाठी व्हॅलेंटाईन्स डे खास
अभिनेता प्रथमेश परबने म्हंटले होते कि त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे खूपच खास आहे. त्याबद्दल त्याने एक लांबलचक पोस्ट शेयर करून माहिती दिली होती. ‘व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. त्यामुळे आम्ही 14 फ्रेब्रुवारी रोजी साखरपुडा (Prathamesh Parab Engagement) करणार आहोत.’
News Title: prathamesh parab engagement photos
हेही वाचा: प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर ‘या’ दिवशी अडकणार विवाह बंधनात, लग्नाची तारीख झाली लीक