Ather Rizta Family Electric Scooter: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड Ather Energy एका नवीन इलेक्ट्रिक स्कूटर वर काम करत आहे. हि एक फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर असेल जी 450 लाइनअपसह कंपनीला मजबूती देईल. अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव Rizta आहे, ज्याचा टीजर खूपच रंजक आहे. आत्तापर्यंत आपण फॅमिली बद्दल ऐकत आलो आहोत. पण आता आपल्याला नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर देखील पाहायला मिळणार आहे. चला तर या जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल.
एथर कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय फॅमिली डोळ्यासमोर ठेऊन डिझाईन करत आहे. यामुळे लोकांना फॅमिलीसोबत सहजपणे प्रवास करण्यास मदत होणार आहे. टीजरमध्ये पाहायला मिळते याचा लुक आणि स्टाईल खूपच हटके असणार आहे. याद्वारे एथर इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आघाडी घेण्याची अपेक्षा आहे.
Ather Rizta डिझाईन
Ather Rizta होरिझाँटल इंटिग्रेटेड LED हेडलाइट आणि टेललाइट सह एन्ट्री करेल. कंपनीने जो टीजर जारी केला आहे त्यामध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला अल्ट्रासाउंडमध्ये दाखवण्यात आले आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची स्टाइलिंग Ather च्या 450 रेंजच्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा वेगळी असेल. कंपनी स्कूटर चालवणाऱ्या आणि मागे बसणाऱ्या प्रवास्यांना एक चांगला अनुभव देऊ इच्छिते.
450 रेंज सारखा बॅटरी पॅक
कंपनीक नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लांब सीट देऊ शकते. जेणेकरून अधिक लोकांना लोकांना बसने सोपे होईल. बॅटरी पॅकबद्दल बोलायचे झाले तर एथरने याबद्दल अजून काही खुलासा केलेला नाही. रिपोर्टन्सुअर Ather Rizta चा बॅटरी पॅक आणि दुसरे हार्डवेअर फीचर्स सध्याच्या 450S आणि 450X मॉडल्स सारखेच असू शकतात.
केव्हा होणार डिलिव्हरी?
अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे झाले तर याला एथर कम्युनिटी डे 2024 दरम्यान सादर केले जाऊ शकते. कंपनीने सांगितले कि Ather Rizta ची डिलिव्हरी 6 महिन्यांमध्ये सुरु होईल. भारतीय ई-स्कूटर मार्केटमध्ये याची टक्कर TVS iQube आणि बजाज चेतक प्रीमियम सारख्या ई-स्कूटर सोबत होईल. असे म्हंटले जात आहे कि हि स्कूटर 1.35 लाख रुपये (संभाव्य एक्स-शोरूम किंमत) मध्ये लाँच केले जाऊ शकते.