ताक पिण्याचे फायदे: उन्हाळा सुरु झाल्यानंतर आपण शहाळ्याचे पाणी, फळांचा रस, ताक, सरबत अशा पेयांचा आहारामध्ये समावेश करतो. उन्हामध्ये थंडावा मिळावा म्हणून शीतपेये खूपच उपयोगी ठरतात. आरोग्यासाठी फायेदेशीर शीतपेयांचा आहारामध्ये नेहमी वापर करावा. प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक खाल्ले जाते. आयुर्वेदामध्ये ताकाला अमृतपेय देखील म्हंटले जाते. आपण या लेखामधून ताक पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक एक चांगला पर्याय आहे. पण आपल्याला एक प्रश्न नेहमी पडतो कि ताक कधी प्यावे. जेवणासोबत प्यावे, जेवणाच्या अगोदर प्यावे कि जेवणाच्या नंतर प्यावे. चला तर मग जाणून घेऊया ताक पिण्याचे फायदे. (5 Wonderful Benefits Of Having Buttermilk Post Meals).
जेवणांनंतर ताक पिण्याचे फायदे
अन्न पचण्यास मदत होते: बहुतेक लोक जेवणा नंतर ताक पिण्याची सवय असते. ताक पचनसंस्थ्येसाठी खूपच फायदेशीर आहे. जेवणा नंतर ताक पिण्याची सवय चांगली असते. ताकामध्ये असणारे बॅक्टेरिया व लॅक्टिक अॅकसिड हे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे जेवणानंतर ताक पिणे चांगले.
पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी: ताकाचे सेवन केल्यामुळे अन्न पचनास मदत मिळते. त्याचबरोबर लॅक्टिक अॅ सिडमुळे आपले पोट चांगले साफ राहते. दैनंदिन आहारामध्ये ताकाचा समावेश केल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या देखील निर्माण होत नाहीत.
अॅसिडिटी कमी होते: जंकफूड किंवा तळलेले पदार्थ खाल्यामुळे आपल्याला अॅेसिडिटीचा त्रास होतो. अशामध्ये पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस होणे असा त्रास होतो. अशावेळी एक ग्लास ताकामध्ये काळीमिरी पावडर किंवा सुंठ पावडर मिसळून या ताकाचे सेवन करावे. असे केल्याने लॅक्टिक अॅंसिड आपल्या पोटातील अॅटसिडिटी कमी करते. आणि गॅस, अपचन आणि पोट जड होणे यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
प्रतिकारशक्ती चांगली राहते: प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी ताक खूपच फायदेशीर आहे. ताकामुळे आपल्याला उर्जा तर मिळतेच त्याचबरोबर आपली प्रतिकार शक्ती देखील वाढते. धावपळीच्या आयुष्यामध्ये कामाचा खूपच तणाव. वेळी-अवेळी खाणे यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. शरीर निरोगी ठेवणे मोठे आव्हान असते. ताकाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहते.
डिहाड्रेशनपासून बचाव: दह्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी टाकून ते चांगले घुसळल्याने ताक तयार होते. त्यामुळे द्यापेक्षा ताकामध्ये जास्त पाणी असते. ज्यामुळे शरीरातील पाणी पातळी नियंत्रणात राहते. शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी पाण्याची गरज असते जी ताकाम्धून पूर्ण होते. नियमित ताक पिल्याने शरीर सतत हायड्रेट राहते आणि डिहाड्रेशन होत नाही.
हेही वाचा: उसाचा रस आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, जाणून घ्या उसाचा रस पिण्याचे फायदे !