Dunki Box Office Collection Day 3: शाहरुखच्या ‘डंकी’ने बॉक्स ऑफिसवर आणली सुनामी, तीन दिवसांत कमवले तब्बल इतके करोड

Dunki Box Office Collection Day 3: शाहरुख खान स्टारर डंकी चित्रपट रिलीज झाला आहे. यावर्षी रिलीज झालेल्या शाहरुखच्या पठाण आणि जवाननंतर डंकी कडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपट रिलीज होताच डंकीने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले. पहिल्या दिवशी चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 35.23 करोड इतके राहिले.

दुसऱ्या दिवशी बाहुबली स्टार प्रभासचा सालार चित्रपट रिलीज झाल्यामुळे डंकीच्या कलेक्शन वर प्रभाव पडला. डंकीचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 30 करोड (Dunki Box Office Collection Day 2) रुपयांपर्यंत खाली आले. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने पुन्हा एकदा वेग पकडला आहे. विकेंडमुळे दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये (Dunki Box Office Collection Day 3) वाढ झाली आहे.

Dunki Box Office Collection Day 3

डंकीचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन (Dunki Box Office Collection Day 3)

डंकीच्या तिसऱ्या दिवसच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाला विकेंडचा चांगला फायदा मिळाला. सालारच्या रिलीजमुळे दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कामीमध्ये घसरण झाल्यानंतर डंकीने तिसऱ्या दिवशी जबरदस्त कलेक्शन केले. तिसऱ्या दिवशी शाहरुख खानच्या डंकीने जवळ जळव 28 करोडचे कलेक्शन केले. यासोबतच चित्रपटाची एकूण कमाई 101 करोड झाली आहे.

चौथ्या दिवशी देखील चित्रपटाला विकेंडचा फायदा मिळू शकतो. तथापि कमीच्या बाबतीत यावर्षी रिलीज झालेल्या शाहरुखच्या पठाण आणि जवानच्या तुलनेमध्ये डंकी दोन्ही चित्रपटांच्या मागे आहे. पठाणने तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 38 करोडचे कलेक्शन केले होते. ज्यानंतर चित्रपटाच्या पहिल्या तीन दिवसाची एकूण कमाई 161 करोड झाली होती. तर जवान चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन जवळ जवळ 68 करोड होते आणि तीन दिवसांची एकूण कमाई 180 करोडच्या आसपास होती.

120 करोड बजटचा चित्रपट (Dunki Film Budget)

राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी चित्रपटाचे बजट 120 करोड आहे. राजुकुमार हिरानी याआधी मुन्नाभाई एमबीबीएस, पीके आणि थ्री इडियट्स सारख्या चित्रपटासाठी ओळखले जात होते. डंकी स्टारकास्टबद्दल (dunki star cast ) बोलायचे झाले तर किंग खानशिवाय चित्रपटामध्ये तापसी पन्नू, बोमन ईरानी, सतीश शाह आणि विक्रम कोचर यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा: पठाण आणि जवान नंतर शाहरुख खानची हॅटट्रिक, ‘डंकी’ची पहिल्या दिवशी छप्पर फाड ओपनिंग

Leave a Comment