इलेक्ट्रिक स्कूटरला मागे टाकते हि सायकल. 350 किमी रेंजसोबत मिळतात लेटेस्ट फीचर्स

Eunorau Flash E-Bike

Eunorau Flash E-Bike: सध्या स्कूटर्सचा ट्रेंड खूपच वाढत चालला आहे. आता लोक छोट्या मोठ्या कामांसाठी देखील स्कूटरचा आधार घेऊ लागले आहेत. वास्तविक स्कूटरची स्पीड खूपच वेगवान असते. ज्यामुळे स्कूटरने आपले काम लवकरच होते. तुम्हाला माहिती असेल कि पूर्वीच्या काळामध्ये लोक जास्तकरून सायकलचा वापर करत असत जो सध्या खूप कमी झाला आहे. हे लक्षात घेऊन आता मार्केटमध्ये काही अशा सायकल आल्या आहेत.

ज्या तुम्हाला स्कूटर सारखी स्पीड देतात. वजन कमी असल्यामुळे या सायकल चांगला वेगाने धावतात. नुकतेच अमेरिकाच्या Eunorau Flash कंपनीने आपली एक धाकड Eunorau Flash E-Bike लॉन्च केली आहे. यामध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या बॅटरी दिल्या आहेत. याची रेंज देखील खूप चांगली आहे. कंपनी दावा केला आहे कि हि सायकल 350 किमीची रेंज देते.

युनोराऊ फ्लॅश ई-बाईकचे डिझाइन

युनोराऊ फ्लॅश ई-बाईक च्या डिझाइन बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला खूपच आकर्षक डिझाईन पाहायला मिळते. कंपनीने या सायकलची बॉडी ॲल्युमिनियम आणि स्टीलपासून बनवली आहे ॲल्युमिनियम आणि स्टीलपासून बनवली आहे. कंपनीने या सायकलला तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे.

याचे पहिले व्हेरियंट फ्लॅश-लाइट आहे, दुसरे फ्लॅश एडब्ल्यूडी आणि तिसरे फ्लॅश व्हेरियंट आहे. यामध्ये तुम्हाला खूपच पॉवरफुल मोटर दिली गेली आहे. याआधीच्या व्हेरियंटमध्ये 750 वॉट ची मोटर, दुसऱ्यामध्ये 750 वॉट ची डुअल मोटर आणि तिसऱ्या व्हेरियंटमध्ये 1,000 वॉट ची इलेक्ट्रिक मोटर दिली जाते. याची बॅटरी सीटखाली बसवली आहे.

युनोराऊ फ्लॅश ई-बाईकची बॅटरी आणि किंमत

या बाईकच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या बाईकमध्ये 2,808wh ची पॉवरफुल एलजी बॅटरी पॅक दिला आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर हा बॅटरी पॅक 350 किलोमीटरची रेंज देतो. तर बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी फक्त 4 तासाचा वेळ लागतो. तथापि कंपनीने या सायकलची किंमत अजून जाहीर केलेली नाही.

News Title: eunorau flash e-bike

हेही वाचा: सिंगल चार्जमध्ये 100 किमी धावणारी इलेक्ट्रिक सायकल, किंमत फक्त…