Richa Chadha Pregnancy: बॉलीवूडमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकामागून एक अभिनेत्री आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करत आहेत. नुकतेच यामी गौतमने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे आणि आता बॉलीवूडमधून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ‘फुकरे’ अभिनेत्री ऋचा चढ्ढा देखील प्रेग्नंट (Richa Chadha Pregnancy) आहे. अभिनेत्री स्वतः सोशल मिडियावर याची घोषणा केली आहे. याचा अर्थ आहे कि आता लवकरच अभिनेत्री ऋचा चढ्ढा आणि अली फजल आईवडील बनणार आहेत. दोघे खूपच खुश आहेत आणि आपला हा आनंद त्यांची सोशल मिडियावर व्यक्त केला आहे. आता कपलचे चाहते उत्साहित झाले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत.
अभिनेत्रीने दिली गुड न्यूज
ऋचा चढ्ढा आणि अली फजलने सोशल मिडिया एक मनमोहक पोस्ट शेयर करून घोषणा (Richa Chadha Pregnancy) केली आहे. त्यांनी 1 + 1 = 3 म्हणत एक फोटो शेयर केला आहे आणि एका कॅप्शनसोबत बातमीची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये म्हंटले आहे कि एका छोट्या हृदयाचा ठोका आमच्या जगामधील सर्वात मोठा आवाज आहे. या पोस्टमध्ये आणखी एक खास फोटो पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये ऋचा चड्ढा आणि अली फजल पडद्याच्या पाठीमागे रोमांस करताना दिसत आहेत. या फोटोच्या वरती प्रेग्नंट महिलेचा इमोजी पाहायला मिळती आहे.
यामीने देखील केली घोषणा
अभिनेत्री यामी गौतमचा पती आदित्य धरने नुकतेच आपल्या आर्टिकल 370 च्या प्रमोशन दरम्यान घोषणा केली आणि सांगितले कि लवकरच त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमण होणार आहे. त्यांनी म्हंटले कि येणारा पाहुणा लक्षी आहे कि गणेश हे लवकरच कळेल. दोघे खूपच खुश आणि उत्साहित दिसले. आदित्य यादरम्यान यामीला काळजी घेताना दिसला.
या वेबसिरीजमध्ये दिसणार ऋचा
अभिनेत्री ऋचा चड्ढा ‘फुकरे 4’ मध्ये भोळी पंजाबनच्या भूमिकेमध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. आता ती लवकरच संजय लीला भन्साळीच्या हीरामंडी वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.
News Title: richa chadha pregnancy announcement
हेही वाचा: यामी गौतम होणार आई! लग्नाच्या तीन वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळना