गौतमीच्या लग्नाआधीची लगबग सुरु, देशपांडे सिस्टर्सचे फोटो व्हायरल, नक्षीदार मेहंदीवर खिळल्या नजरा

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : सध्या सिनेइंडस्ट्रीमध्ये लग्नाची लगबग सुरु आहे. एकमागून एक दिग्गज कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसाद जवादे-अमृता देशमुख, सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे हे कपल्स विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर आता सिने इंडस्ट्रीमधील आणखी एक कपल विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

शेयर केले मेहेंदी सोहळ्याचे फोटो (Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding)

गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकरच्या यांच्या लग्नाआधीच्या विधीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपासून बहिणीच्या लग्नाची मृण्मयी जय्यत तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गौतमी स्वानंदच्या संगीत सोहळ्यासाठी अभिनेत्री तयारी करत होती. त्याचबरोबर तिने बहिणीच्या केळवणाचाहि देखील तयारी केली होती. अशामध्ये आता गौतमी आणि स्वानंद यांच्या मेहेंदीच्या फोटोनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे (Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding) यांचे मेहेंदी सोहळ्यामधील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये गौतमीच्या मेहेंदी सिरेमनीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मृण्मयीने शेयर केलेल्या फोटोमधील दोघी बहिणींचा लुक चर्चेचा विषय ठरला आहे. दोघी बहिणी या खास प्रसंगी पारंपारिक लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. मृण्मयीने खानाचा ड्रेस घातला आहे तर गौतमी गुलाबी रंगाच्या घागरामध्ये पाहायला मिळत आहे. दोघींच्या हातावर नक्षीदार मेहेंद सजली आहे.

पुढच्या दोन दिवसांमध्ये गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर विवाहबंधनात अडकणार आहेत. अनेक दिवसांपासून गौतमीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. स्वानंद तेंडुलकरबरोबर असलेल्या रिलेशनशिपमुळे गौतमी चर्चेत आली होती. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. गौतमी व स्वानंद यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: मुहूर्त ठरला, मंडप सजला! स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई, मेहेंदीचे फोटो व्हायरल

Leave a Comment