मुहूर्त ठरला, मंडप सजला! स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई, मेहेंदीचे फोटो व्हायरल

Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. अशामध्ये आता ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. जुलै महिन्यामध्ये साखरपुडा झाल्यानंतर दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता लागून राहिली होईत. अखेर त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधीला सुरुवात झाली आहे.

इंस्टा स्टोरीमध्ये शेयर केले फोटो (Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding)

स्वानंदीने तिच्या मेहेंदी सोहळ्यादरम्यानचे काही खास फोटो शेयर केले आहेत. जे सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताहेत. फोटोमध्ये सोहळ्यासाठी फुलांची आकर्षक सजावट केल्याची पाहायला मिळत आहे. तर एका मोठ्या फलकावर “वेलकम टू स्वानंदीची मेहंदी…” असं लिहिलेलं दिसतंय. फोटोमध्ये आनंदी असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding

स्वानंदी टिकेकर हि अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमधून ती घराघरामध्ये फेमस झाली होती. त्यानंतर ती अस्सं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई… या सिरियल्समध्ये देखील पाहायला मिळाली. स्वानंदीचा होणारा नवरा आशिष कुलकर्णी हा गायक आणि गीतकार आहे. आता लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा: गौतमी देशपांडेचंही ठरलं, ‘या’ व्यक्तीसोबत अडकणार विवाहबंधनात, मेहेंदीचे फोटो व्हायरल

Leave a Comment