रितेश-जेनेलियाच्या मुलांचं आजीबरोबर ‘असं’ आहे बॉण्डिंग! जेनेलियाने शेयर केले लातूरमधील न पाहिलेले फोटो

Genelia Deshmukh: रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांची जोडी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. दोघे सोशल मिडियावर खूप सक्रीय असतात. चाहत्यांचा दोघे नेहमी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असतात. सध्या अभिनेत्री जेनेलियाने शेयर केलेल्या लातूरमधील फोटोंमुळे चर्चेमध्ये आली आहे. फोटोंमध्ये चाहत्यांना रितेशची आई, मुलं आणि पुतणी यांच्यामधील सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.

शेयर केले फोटो (Genelia Deshmukh)

देशमुख कुटुंबीय कोणताही सण एकत्र येऊन साजरा करतात. तर लागोपाठ सुट्ट्या आल्या कि ते लातूरमधील आपल्या गावाला नक्की येतात. दरम्यान रितेश-जेनेलिया सध्या लातूरमधील आपल्या गावी बाभळगाव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अभिनेत्री जेनेलियाने यादरम्यानचे कुटुंबियांचे काही गोड फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेयर केले आहेत.

Genelia Deshmukh

अभिनेत्रीने शेयर केलेल्या फोटोमध्ये ती तिची मुलं रियान आणि राहीलसोबत वेळ घालवताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये रितेशचा मुलगा आणि पुतणी त्याच्या आईसोबत गप्पागोष्टी करताना पाहायला मिळत आहेत. फोटो शेयर करत जेनेलियाने कॅप्शनमध्ये “गावच्या खाटेवर बसून आजीमाबरोबर खूप साऱ्या गप्पा आणि गप्पांबरोबर पोहे अजून काय हवं? आमच्या गावच्या आठवणी” असं लिहिलं आहे. रितेशची दोन्ही मुलं त्यांच्या आजीला ‘आजीमा’ अशी हाक मारतात हे यावरून स्पष्ट होत आहे.

Genelia Deshmukh

जेनेलियाने हे फोटो शेयर करताच ते सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या गोड फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जेनेलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. शिवाय ती या वर्षामध्ये आणखी काही नवीन चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.