मुनव्वर फारूकी बनला ‘बिग बॉस-17’ चा विनर, ट्रॉफी सोबत मिळाले ‘इतके’ रुपये

Bigg Boss 17 Winner: बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले खूप भव्य प्रकारे संपला. सलमान खानद्वारे होस्ट केलेल्या या शोबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून दर्शकांमध्ये एक खास उत्साह होता. टीआरपी मध्ये देखील हा शो टॉप मध्ये राहिला. शेवटी बिग बॉस 17 मध्ये मुनव्वर फारूकी (Bigg Boss 17 Winner) ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. सलमान खानने विनरच्या नावाची घोषणा करत मुनव्वर फारूकी चे नाव घेतले. गेली अनेक दिवसांपासून दर्शकांना या सीजनच्या विनरच्या नावाची उत्सुकता होती. मुनव्वरसाठी हा दिवस विशेष ठरला कारण त्याचा वाढदिवस देखील होता. बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकून मुनव्वरने आपला वाढदिवस संस्मरणीय बनवला.

Bigg Boss 17 Winner– मुनव्वर फारूकी बनला बिग बॉस-17’ चा विनर

मुनव्वर फारुकी सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये राहिला. घरामध्ये त्याची वागणूक आणि प्रत्येक टास्कमध्ये त्याचा सभाग वाखाणण्याजोगा होता. मुनव्वरला बिग बॉस 17चा टॉप कंटेस्टेंट मानले जात होते. त्याच्या खेळामुळे त्याची फॅन फॉलोइंग कमालीची वाढली आहे. अशा स्थितीमध्ये मुनव्वर फारुकी जिंकल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत.

बिग बॉस 17 च्या फिनालेमध्ये अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, मन्नारा चोपड़ा, आणि अंकिता लोखंडे टॉप 5 मध्ये सामील होते. घरामधील सर्व कंटेस्टेंटला हरवून मुनव्वर फायनल (Bigg Boss 17 Winner) जिंकला आहे. सलमान खानने मुनव्वरला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव केला. केवळ भारतातच नाही तर जगभरातून चाहते मुनावरचे अभिनंदन करत आहेत.

मुनव्वर सोशल मिडियावर सर्वात लोकप्रिय सेलेब्रिटी आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 10 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बिग बॉस 17 चा विनर कोण असेल याबद्दल त्याच्या नावाची नेहमी चर्चा होत असे आणि दर्शकांकडून देखील त्याला खूप समर्थन मिळाले.

मुनव्वरला ‘लॉक-अप’ शोमधून मिळाली लोकप्रियता

मुनव्वरला ‘लॉक-अप’ शोमधून खास लोकप्रियता मिळाली होती. तो या इवेंटचा विजेता राहिला. मुनव्वर 70 दिवस ‘लॉक-अप’ शोमध्ये राहिला. इवेंट जिंकल्यानंतर मुनव्वरला एक ट्रॉफी, 20 लाख रुपये रोख बक्षीस, एक कार मिळाल आणि त्याचबरोबर इटलीच्या टूरवर जाण्याची संधी मिळाली.

Who is Munawar Faruqui – कोण आहे मुन्नवर फारुकी

मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोपड़ा बिग बॉस-17चे टॉप-3 कंटेस्टेंट बनले. यामधील मुनव्वर फारुकीने बिग बॉस-17 ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. सलमान खानने मुनव्वर फारुकीला बिग बॉस 17 ची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाखांचे बक्षीस आणि कारही मिळाली आहे.

मुनव्वर फारुकी एक प्रसिद्ध कॉमेडीयन आहे. जो स्टँड-अप कॉमेडी साठी खूप प्रसिद्ध आहे. आपल्या अनोख्या आणि विनोदी शैलीमुळे त्याला खूप लोकप्रियता मिली आहे. तथापि अनेकवेळा मुनव्वर आपल्या शोमध्ये केलेल्या स्टँड-अप कॉमेडीमुळे वादामध्ये देखील सांपडला आहे.