Oppo Find X7 Oppo Find X7 Ultra चे स्पेसिफिकेशंस आले समोर, जाणून घ्या कधी लाँच होणार स्मार्टफोन

Oppo Find X7 Oppo Find X7 Ultra: नवीन वर्ष येण्यास आता काहीच वेळ शिल्लक राहिला आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या कस्टमर्स साठी एक खास भेट घेऊन आली आहे. कंपनी आपल्या फाइंड एक्स 7 सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये पेश करणार आहे. ज्यांचे नावे Oppo Find X7 Oppo Find X7 Ultra अशी आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 8 जानेवारी रोजी चीनमध्ये लाँच केले जाणार आहेत. हा स्मार्टफोन खास स्पेसिफिकेशंस आणि अनेक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया या फोनच्या (Oppo Find X7 Oppo Find X7 Ultra) स्पेसिफिकेशंस आणि इतर डीटेल्सबद्दल.

Oppo Find X7 Find X7 Ultra

दोन्ही स्मार्टफोन्सची खास वैशिष्ट्ये (Oppo Find X7 Oppo Find X7 Ultra)

दोन्ही स्मार्टफोनच्या खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया. दोन्ही डिव्हाईसमध्ये ड्युअल टोन बॅक पॅनल आणि पाच होल कटआउट डिझाइन आहे. दोन्ही फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Oppo Find X7 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि Oppo Find X7 Ultra मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Oppo Find X7 सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये 8 जानेवारीला लाँच होतील. हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Oppo Find X7 Find X7 Ultra

Oppo Find X7 Specifications

Oppo Find X7 समार्टफोनमध्ये युजर्सला 6.78 इंच चा 1.5K OLED डिस्प्ले दिला जाईल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनच्या स्मूथ परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर असेल. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज, 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह बाजारात येईल. यामध्ये 50mp प्रायमरी सेंसर, 8MP चा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेटअप असेल. डिव्हाईसमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिले, जी 100W फास्ट चार्जिंगसह येईल. (Oppo Find X7 Oppo Find X7 Ultra) हा फोन स्टारी स्काय ब्लॅक, सी अँड स्काय, डेजर्ट मून सिल्वर, स्मोकी पर्पल कलर ऑप्शन सोबत मिळेल.

Oppo Find X7 Ultra Specifications

या डिव्हाईमध्ये 6.78 इंच चा 2K OLED डिस्प्ले दिला जाईल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाईल. हा तीन स्टोरेज व्हेरिएंट 12GB RAM आणि 256GB STORAGE, 16GB RAM आणि 256GB STORAGE, 16GB RAM आणि 512GB STORAGE मध्ये मिळेल. कॅमेरा मॉड्यूल बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 50MP चा प्रायमरी सेंसर (Sony LYT-900), 48MP चा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 8MP का टेलीफोटो सेंसर, 2MP मॅक्रो सेंसर कॅमेरा असेल. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन अल्ट्रा पाइन शॅडो इंक, सी अँड स्काय, डेजर्ट मून सिल्वर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल.

हेही वाचा: 16GB पर्यंत रॅम आणि 100x झूमसह लाँच झाला Vivo X100 Pro, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स